आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०४/०७/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
आजचे पंचांग
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ १३ शके १९४४
दिनांक :- ०४/०७/२०२२,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०९,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति १८:३३,
नक्षत्र :- मघा समाप्ति ०८:४४,
योग :- सिद्धि समाप्ति १२:२१,
करण :- कौलव समाप्ति –:–,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – आर्द्रा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- वृषभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. १२प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०७:३७ ते ०९:१६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०५:५९ ते ०७:३७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:१६ ते १०:५५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:५१ ते ०५:३० पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:३० ते ०७:०९ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
घबाड १८:३३ नं.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ १३ शके १९४४
दिनांक = ०४/०७/२०२२
वार = इंदुवासरे(सोमवार)
मेष
आपल्या मर्जी प्रमाणे दिवस घालवा. सामुदायिक गोष्टींवर भाष्य करू नका. कौटुंबिक सौख्य जपाल. मुलांची बाजू समजून घ्यावी. जन संपर्कातून काम होईल.
वृषभ
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आवडत्या गोष्टी तुमच्या समोर हजर राहतील. चैन करण्याकडे आपले अधिक लक्ष राहील. मौजमजेला प्राधान्य द्याल. मनातील काळजी दूर साराल.
मिथुन
मानसिक दोलायमानता जाणवेल. स्थिर विचार करावेत. कामात अति घाई करून चालणार नाही. क्षणिक आनंद उपभोगाल. शारीरिक थकव्या बरोबर वैचारिक थकवा जाणवेल.
कर्क
ऐषारामाच्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. दिवस आळसात घालवाल. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. आर्थिक कामातील कागदपत्रे व्यवस्थित हाताळा. कामसौख्याचा आनंद घ्याल.
सिंह
अडचणीतून मार्ग निघेल. सामाजिक कामात मदतीचा हात पुढे कराल. सर्वांशी सहृदयतेने वागाल. तुमच्या मनाची विशालता दिसून येईल. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर संभवते.
कन्या
कामात विचारपूर्वक पाऊले टाकावीत. भावंडांशी दुराग्रही वागू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. भागीदाराशी सलोखा वाढवावा लागेल. कामातील अडचण दूर होईल.
तूळ
जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल. पोटाच्या समस्या जाणवतील. छुप्या शत्रूंचा त्रास कमी होईल. हातातील कामात यश येईल.
वृश्चिक
मानसिक अस्वस्थता जाणवेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. नवीन ओळखी होतील. चुकीच्या संगतीत अडकू नका. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल.
धनू
अचानक धनलाभाची शक्यता. आवडते साहित्य वाचायला मिळेल. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांची बाजू समजून घ्यावी. जुन्या कामात वेळ जाईल.
मकर
केलेल्या कामातून समाधान मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. अगदीच गरज असेल तरच प्रवास करावा. चालू कामास गतीमानता येईल. घरातील कामात समाधानी असाल.
कुंभ
कौटुंबिक खर्च आटोपता ठेवावा लागेल. उगाच कोणाशीही वाद वाढवू नका. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. जवळचा प्रवास करावा लागेल. दिवस मजेत घालवाल.
मीन
दिवस कटकटीचा जाऊ शकतो. गोष्टी शांतपणे जाणून घ्याव्यात. रागावर नियंत्रण ठेवावे. घाई-घाईने कोणतीही कृती करायला जाऊ नये. करमणुकीचा आनंद घ्याल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर