इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि २८/०३/२०२२

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०७ शके १९४४
दिनांक :- २८/०३/२०२२,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४१,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति १६:१६,
नक्षत्र :- श्रवण समाप्ति १२:२४,
योग :- सिद्ध समाप्ति १७:३९,
करण :- कौलव समाप्ति २७:२५,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- मीन – उ. भा.,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०७:५९ ते ०९:३१ पर्यंत,

लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:२८ ते ०७:५९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:३१ ते ११:०३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:०९ ते ०६:४१ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
पापमोचनी एकादशी, अमृत १२:२४ प., घबाड १२:२४ नं. १६:१६ प. दग्ध १६:१६ प.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०७ शके १९४४
दिनांक = २८/०३/२०२२
वार = इंदुवासरे(सोमवार)

मेष
बोलतांना शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. तुमच्याबाबत गैरसमज निर्माण होऊ शकतो. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. कामात स्त्री वर्गाचा हातभार लागेल. कमिशनमधून लाभ मिळेल.

वृषभ
आततायीपणा करून चालणार नाही. रागावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. तुमच्यातील कार्यक्षमता दाखवून द्यावी. आपल्या कामाशी प्रामाणिक रहा.

मिथुन
अनावश्यक खर्च टाळावेत. जुनी प्रकरणे त्रासदायक ठरू शकतात. मानसिक स्वास्थ्य जपावे. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. वरिष्ठांची मर्जी संपादन करा.

कर्क
मैत्रीतील गैरसमज दूर करावेत. जनसंपर्क वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. अचानक धन लाभाची शक्यता. मालमत्तेचे व्यवहार सावधतेने करावेत.

सिंह
जोडीदाराची प्रगती दिसून येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कामात काही स्वरुपाचे बदल करावे लागतील. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल.

कन्या
दिवस आपल्या मर्जी प्रमाणे घालवाल. प्रवासात काळजी घ्यावी. मुलांचे विचार विरोधी वाटू शकतात. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.

तूळ
मानसिक चंचलता जाणवेल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील. कलेचा आस्वाद घ्याल. जवळचे मित्र भेटतील.

वृश्चिक
काही सांसारिक तडजोडी स्वीकाराव्या लागतील. प्रवासात क्षुल्लक त्रास जाणवू शकतो. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. घरासाठी मोठी वस्तु खरेदी कराल. सामुदायिक वादापासून दूर राहा.

धनू
आरोग्यात सुधारणा होईल. धाडसाने कामे हाती घ्याल. कौटुंबिक खर्च नियंत्रणात ठेवा. चुगल्या करणार्‍या व्यक्तींपासून दूर रहा. कष्टाने कार्य पार पाडाल.

मकर
क्षुल्लक कारणांवरून चीड-चीड वाढेल. जवळच्या ठिकाणी प्रवासाचा योग येईल. कौटुंबिक जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडाल. मानसिक चंचलतेला आवर घालावी. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात.

कुंभ
दिवसभर कामाची दगदग राहील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. आपले व्यक्तिमत्वाची इतरांवर छाप पाडाल. अपयशाला घाबरून जाऊ नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

मीन
झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. पत्नीची उत्तम साथ मिळेल. क्षणिक सौख्याची अनुभूती घ्याल. भावंडांशी मतभेद संभवतात. तरुणाचे विचार जाणून घ्याल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button