डॉ.चंद्रकला हासे ढगे यांना डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन उत्कृष्ट प्राध्यापिका पुरस्कार

अकोले प्रतिनिधी:–
अकोले तालुक्यातील कळस येथील डॉ.चंद्रकला हासे ढगे यांना शिक्षक दिनानिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन उत्कृष्ट प्राध्यापिका पुरस्कार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुणे येथील भारतरत्न मौलाना आझाद सामाजिक,शैक्षणिक आणि क्रीडाविषयक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी च्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ.चंद्रकला पुंजा हासे यांना शैक्षणिक व सामाजिक कामगिरीबद्दल या पुरस्काराने जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल पुणे येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथील माजी कुलगुरू डॉ.एस एन पठाण संस्थेचे अध्यक्ष अमानत शेख, पुणे महानगरपालिके च्या माजी नगरसेविका हसीना इनामदार, प्राचार्य डॉ.एन बी शेख, प्राचार्य डॉ.विलास पाटील हे उपस्थित होते.

प्रा. डॉ.चंद्रकला हासे ढगे या कळस येथील प्राचार्य डॉ. शिवाजीराव ढगे यांच्या पत्नी असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र या अभ्यास मंडळावर सदस्य आहेत. त्यांचा अध्यापनाचा 33 वर्षे तर संशोधनातील 20 वर्षे अनुभव आहे. त्या पीएच.डी च्या मार्गदर्शक आहेत. त्यांनी अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य केले आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार मा. अजितदादा पवार, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समिती चे सभापती कैलासराव वाकचौरे, कळस चे सरपंच राजेंद्र गवांदे, जयकिसान दूध संस्था चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, संजय हासे, बाळासाहेब ढगे यांनी अभिनंदन केले.