उद्योग व्यवसायात जिद्द व चिकाटी महत्वाची -सुनिलगिरी महाराज.

न्यू साई मंगल ज्वेलर्स शॉप चे उद्घाटन .
दत्तात्रय शिंदे
नेवासा दि 6
अथक परिश्रम घेऊन स्वतःचे व्यावसाय उभारून रोजगारनिर्मिती करणे हि काळाची गरज आहे तसेंच उजवलं भविष्यासाठी व नवनवीन पिढी प्रमाणे व्यवसायात बदल करणे हि देखील काळाची गरज आहे छोटयाशा दुकानातून भव्य दिव्य दालनाकडे वाटचाल करणे हे प्रगतीचे पाऊल आहे असे प्रतिपादन ह.भ.प सुनिलगिरी महाराज यांनी केले
शहरातील हेडगेवार चोकातील मुख्य ठिकाणी न्यू साई मंगल ज्वेलर्स शॉप चें उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी
महाराजांच्या हस्ते फित कापून व नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख साहेब यांनी भेट दिली
यावेळी सुनिलगिरी महाराज म्हणाले की करोना सारख्या संकटात सर्वात जास्त तोटा हा व्यापारी वर्गचा झाला असताना देखील पुन्हा नव्याने भरारी घेत आता आपली जिद्द व चिकाटी दाखवली ही अभिमानाची बाब आहे आता भविष्यात नगर पुणे अश्या ठिकाणी सोने खरेदी साठीजाण्याची गरज नाही नवनवीन प्रकारचे घडीव सोने गावांत मिळणार असल्याने ही देखील महिला वर्गा साठी आनंदाची बाब आहे तसेच नेवासा येथील नागरीकांना आनंद घेता येईल
यावेळी न्यू साई मंगल ज्वेलर्स शॉप चें संचालक रमाकांत सोनार, अतुल सोनार,अनिकेत सोनार, प्रथमेश सोनार, राहुल सोनार, संकेत सोनार, हेडगेवार पतसंस्था चेरमन सुरेश नळकांडे, माजी उपनगर अध्यक्ष नंदकुमार पाटील साई आदर्श पतसंस्था चे मॅनेजर संदीप लोहंकरे, वैभव कांबले, राहुल दारकुंडे, नारायण नळकांडे,किरण घोडेकर, सुधीर बोरकर, रमेश शिंदे, विनायक नळकांडे ,नितीन ढवळे, महेश मापारी, काकासाहेब गायके, लक्ष्मण जगताप,दत्तात्रय शेटे, उदय सांगळे दीपा मापारी, यांच्या सह परिसरातील व्यापारी वर्ग व मोठया प्रमाणावर मित्र परिवार उपस्थित होतें