संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना थोरातांनी दिल्या विविध सुविधा
संगमनेर ( प्रतिनिधी ) मोठी समृद्ध परंपरा लाभलेल्या पायी दिंडी सोहळ्यातील संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे संगमनेर तालुक्यात आगमन झाले असून महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार आलेल्या सर्व वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, आरोग्याच्या सुविधेसह विविध सुविधा पुरविल्या जात असून यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यात आली असून माजी आमदार डॉ.सुधीर तांबे व इंद्रजीत भाऊ थोरात यांनी या पालखीचे स्वागत केले. याचबरोबर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालखीचे अध्यक्ष ॲड.सोमनाथ घोटेकर यांच्यासह गावकरी व वारकऱ्यांशी संवाद साधला. याचबरोबर वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्या वतीने दोन ॲम्बुलन्स 25 डॉक्टरांचे पथ, नर्स अशी आरोग्य सेवा देण्यात आली असून प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर, वारकऱ्यांसाठी चहा,नाष्टा, राहण्याची सुविधा, अशा अद्यावत सुविधा पुरवल्या आहेत. इंद्रजीतभाऊ थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहाच्या वतीने विविध सहकारी संस्थांनी दरवर्षीप्रमाणे ही सेवा दिली आहे. यामध्ये पहिल्या दिवशी 1189 वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली.
दिंडीमध्ये येणारे वारकरी दरवर्षी संगमनेर तालुक्यामध्ये आल्यानंतर त्यांची अत्यंत चांगली सोय केली जाते. यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असते. दिंडीचे प्रमुख ॲड. सोमनाथ घोटेकर म्हणाले की, संत निवृत्तीनाथ महाराज पालखीला मोठी ऐतिहासिक महत्त्व आहे. या पालखीचे दरवर्षी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चांगले स्वागत होत असून महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत त्यांनी कायम चांगले सुविधा देताना वारकऱ्यांची काळजी घेतली आहे.
तर ॲड.त्रिंबक गडाख म्हणाले की, इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याकरता सर्व पाहणी करण्यात आली. याचबरोबर आवश्यक त्या बाबी पुरवण्यात आल्या. वारकरी हा अतिथी असून त्याचे उस्फुर्त स्वागत ही परंपरा संगमनेर तालुक्याने कायम जपले असल्या