बारावी परीक्षेचा गुरुवारी निकाल जाहीर होणार

पुणे–12 वीचा निकाल उद्या गुरुवारी दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहिर करण्यात येणार आहे
10 वी व 12 वीचा निकाल कधी लागणार या कडे सर्वांचे लक्ष लागले होते त्यापैकी 12 परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे 10 वी साठी जवळपास 15 लाख 77,256 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली आहे त्यापैकी 8,लाख 44,116 मुले व 7लाख 33,067 मुलींनी परीक्षा दिली आहे राज्यात 5033 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली आहे. तर
12 वी ची विज्ञान शाखेतील 6,60,780 विद्यार्थी ,वाणिज्य शाखेतील 4,04,761 विद्यार्थी,कला शाखेतील 3,45,532 विद्यार्थी असे एकूण 14,57,293 विद्यार्थी नी परीक्षा दिली आहे.
12 वी परीक्षेचा निकाल उद्या गुरुवार दि 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहिर करण्यात येणार आहे व 10 वीचा निकाल 10 जून पुर्वी लागणार आहे.
10 वी आणि 12 वीचा निकाल खालील वेबसाइट वर आपण बघू शकता.
ssc and Hsc result 2023