चाईल्ड केअर तर्फे मिलिंद खारपाटील यांना उरण विशेष पुरस्कार

उरण रायगड
हेमंत सुरेश देशमुख
चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड यांच्या तर्फे दिला जाणारा पत्रकारिता बद्दल उरण विशेष सम्मान 2022पुरस्कार हा या वर्षी पत्रकारितेमुळे जास्त लोकप्रिय असलेले श्री मिलिंद खार पाटील यांना देण्यात आला
द्रोणागिरी स्पोर्ट आशो. च्या मैदानाची ओढ या विषयावर चर्चा (संभाषणे ) या कार्यक्रमाचे आवचित्य साधून श्री मिलिंद खारपाटील साहेब यांना चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड तर्फे उरण विशेष सम्मान 2022 हा पुरस्कार द्रोणागिरी स्पोर्ट आशो. चे अध्यक्ष श्री महादेव घरत यांच्या हस्ते देण्यात आला
या कार्यक्रमाला श्री महादेव घरत (अध्यक्ष -द्रोणागिरी स्पोर्ट आशो), श्री विकास कडू (संस्थापक,, अध्यक्ष -चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण )श्री दिलीप तांडेल (सचिव- द्रोणागिरी स्पोर्ट आशो.),श्री संजय होळकर (आदर्श शिक्षक ) श्री रमाकांत म्हात्रे (सामाजिक कार्यकर्ते ), श्री मिलिंद खारपाटील (महामुंबईचे संपादक ), श्री सचिन पाटील (शाखा प्रमुख डोगरी )श्री माणिराम म्हात्रे, श्री मनोज ठाकूर (कार्यध्यक्ष -चाईल्ड केअर संस्था )तसेच द्रोणागिरी स्पोर्ट आशो. चे पदाधिकारी, चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण चे सभासद आणी शेकडो द्रोणागिरी स्पोर्ट आशो. चे समर्थक उपस्थित होते
कार्यक्रमामध्ये चला खेळाडू घडवूया या विषयावर श्री रमाकांत म्हात्रे, श्री मिलिंद खार पाटील, श्री विकास कडू, श्री संजय होळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले
हा कार्यक्रम उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत श्री महादेव घरत यांनी केले
कार्क्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय होळकर यांनी केले तर श्री महादेव घरत यांनी आभार प्रदर्शन केले