मराठी पञकार परीषदेच्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे आवाहन

जालना, /प्रतिनीधी-
मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. या अधिवेशनामध्ये पत्रकारांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने या अधिवेशनात उपस्थित राहावे, असे आवाहन जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष फकिरा देशमुख, परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी अब्दुल हाफिज यांनी केले आहे.
यासंदर्भात जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पत्रकारांची मात्तृसंस्था असणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवशीय अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांच्या नियोजनामध्ये या अधिवेशनाची तयारी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ करत आहे.
या अधिवेशनात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. दोन दिवस विविध विषयावर चर्चासत्र व वेगवेगळे कार्यक्रम ही आयोजित करण्यात आले आहेत. अनेक मान्यवराबरोबर मान्यवर पत्रकारांचीही उपस्थिती या अधिवेशनात लाभणार आहे. पत्रकारांची एकजूट व पत्रकारासमोरील समस्या याविषयावर अधिवेशनात चर्चा होणार आहे. तरी या अधिवेशनास जालना जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करावे, असे आवाहन जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष फकिरा देशमुख, मार्गदर्शक, परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी अब्दुल हाफिज, कार्याध्यक्ष किशोर आगळे, जिल्हा सरचिटणीस नारायण माने, उपाध्यक्ष अभयकुमार यादव, दिनेश जोशी, कोषाध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी, चिटणीस शेख मुसा, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोहनराव मुळे, गणेश औटी, अशोक शहा, राजकुमार भारुका, संतोष सारडा, धनंजय देशमुख, सर्जेराव गिऱ्हे आदींनी केले आहे.
