अगस्त्य ट्रेकर्सच्या गिर्यारोहाकांकडून ‘ वजीर सुळका ‘ सर ..

—————————————-–—-
अकोले
अगस्त्य ट्रेकर्स, अकोले येथील प्रसाद दत्तात्रय शेटे, प्रणव भागवत सहाणे आणि अक्षय भागवत आरोटे हे युवक नेहमीच गिर्यारोहणासाठी वेगवेगळ्या गड, किल्ले,सुळके,घळी यांचा शोध घेऊन साहसी गिर्यारोहणाचा आनंद घेत असतात. अत्तापर्यंत त्यांनी ५० हून अधिक किल्ले सर केलेले आहेत.त्यात वजीर सुळका,मोरोशीचा भैरवगड,दुर्ग त्रिकुट अलंग-मदन-कुलंग,जीवधन,वानरलिंगी सुळका,हरिहर गड,कलावंतीण दुर्ग,खुंटीच्या वाटेने किल्ले हडसर,जीवधन व्हॅली क्रॉसिंग यांसारख्या महाराष्ट्रातील कठीण श्रेणीतील गड- किल्यांचा समावेश आहे.
यावेळी मात्र त्यांनी जरा अवघड असे स्वतःलाच आव्हान दिले आणि एका सुळक्याची निवड केली.
शहापूर तालुक्यातील वांद्रे हे तसे छोटेसे गांव. त्याच्या लगत असलेला सह्याद्रीच्या कुटुंबातीलच माहुली किल्ला. या किल्ल्याच्या रेंजमध्ये बुद्धिबळाच्यापटावरील वजिराप्रमाणे ९० अंशाच्या काटकोनात उभा ठाकलेला “वजीर सुळका”. या सुळक्याची उंची साधारण २५० ते २८० फूट. पण पाहताक्षणीच धडकी भरेल असा त्याचा भारदस्तपणा. पण हे साहसी आव्हान स्वीकारायचं आणि पूर्ण देखील करायचचं असा चंग बांधलेले हे तिघं युवक २७ डिसेंबरच्या रात्री वांद्रे गावातील नंदिकेश्वर महादेव मंदिरात मुक्कामी पोहचले.
२८ डिसेंबर रोजी सकाळी ०७.००वाजता नाश्ता करून सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर्स, कल्याण यांच्या ग्रुपसोबत पवन घुगे आणि रनजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली वजीर सुळका सर करायला कूच करायला सगळी टीम निघाली. साधारण सकाळी ०८.२५ वाजता वजीर सुळक्याच्या पायथ्याशी हे सर्व गिर्यारोहक पोहचले. पुढच्या १० मिनिटांत आवश्यक त्या सूचना घेऊन मोहिमेसाठी सज्ज झाले. एकूण ५ टप्प्यांची चढाई असलेला वजीर सुळका सर्व मेम्बर्सनी सर केला. सुळक्याच्या माथ्यावर आपल्या भारत देशाचा तिरंगा फडकावून सर्वांनी मानवंदना दिली आणि पायथ्याच्या दिशेने रॅपलिंगच्या सहाय्याने उतरण्यास सुरुवात केली.
या अवघड अशा गिर्यारोहणाच्या मोहिमेत अकोले येथील प्रसाद दत्तात्रय शेटे, प्रणव भागवत सहाणे आणि अक्षय भागवत आरोटे आणि कल्याण येथील पवन घुगे, रणजित भोसले, दर्शन देशमुख, सुहास जाधव, संजय करे, राहुल घुगे, अभिजीत कांबळे, अभिषेक गोरे, स्वप्नील भोईर (ड्रोन पायलट),तसेच कोल्हापुर,संभाजीनगर,पुणे,नवी मुंबई,ठाणे,नाशिक येथील एकूण २० युवक सहभागी झाले होते.
💥💥