अकोले तालुक्यात लिंगदेव येथील प्रस्तवित MIDC जागेची अधिकाऱ्यांनी केली पाहणी!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील बहुचर्चित प्रस्तावित एम. आय. डी. सी. साठी आवश्यक असणाऱ्या जागेची आज आमदार किरण लहामटे यांनी अधिकाऱ्यां समवेत पाहणी केली

मौजे लिंगदेव, ता. अकोले, अहमदनगर येथे औद्योगिक क्षेत्राची स्थळपाहणी करणेसाठी भुनिवड समिती ने आज दि 22जुलै रोजी सदर क्षेत्राची स्थळपाहणी केली
अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ किरण लहामटे यांच्या पाठपुराव्यानंतर आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चे महाव्यवस्थापक (भूसंपादन) मऔविम, मुंबई श्री संदीप आहेर यांच्या आदेशांनव्ये आज अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे एम आय डी सी साठी प्रस्तावित जागेची पाहणी केली जागेची पाहणी नंतर अधिकारी लवकरच जागेच्या संदर्भातील प्रस्ताव सादर करणार आहेत.
यावेळी .म.औ.वि. महामंडळ, मुंबई च्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, म.औ.वि. महामंडळ,नाशिक. प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, उपअभियंता संदीप बडगे, वरिष्ठ भुमपाक सुधीर उगले, भुमापक श्री. राठोड आदींसह आमदार डॉ किरण लहामटे यांचे सह तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

एम आय डी सी साठी पूर्ण सहकार्य करू – हाडवळे
तालुक्यात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या एम आय डी सी साठी गावाने जागा देण्याचा निर्णय घेतला आहे आवश्यक असणारी जागा त्यासाठी दिली जाईल कमी पडत असली तरी लगत चे शेतकरीही त्यासाठी जागा उपलब्ध करून देतील प्रदूषण निर्माण करणाऱ्या केमिकल कंपन्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त कँपन्या उद्योजकांना या ठिकाणी प्राधान्य द्यावे असे यावेळी लिंगदेव येथील कार्यकर्ते भाऊसाहेब हाडवळे यांनी यावेळी सांगितले
