दाते सरांचे काम जनसेवेचे, निरपेक्षेचे : ह. भ. प. नामदेव महाराज घुले

काटाळवेढा येथील ७५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
काटाळवेढा येथील ७५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण ह.भ.प. नामदेव महाराज घुले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यामध्ये प्रतिमा-२३, आभाळवाडी, डोंगरवाडी ते पळसपुर रस्ता (इजिमा-४१) मजबुतीकरण डांबरीकरण करणे ४५ लक्ष, कातळवेढा ते दत्तवाडी रस्ता( ग्रामा-२४१) मजबूतीकरण व डांबरीकरण करणे – २४लक्ष, यांचे लोकार्पण तर जिल्हा परिषद सेस अंतर्गत गुंड वस्ती ते भाईक वस्ती रस्ता सुधारणा करणे – ३ लक्ष, डोंगरवाडी ते रामकृष्ण गढी रस्ता मजबुतीकरण करणे – ३ लक्ष या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना रामकृष्ण गढी गडाचे महंत नामदेव महाराज घुले म्हणाले दाते सरांचे काम जनसेवेचे, विकासाचे काम, निरपक्षतेने करणारे, साधुसंतांचा आदर कृतीतून दाखवणारे, आत्मयतेतून धर्माची वाट जाणणारे, पारनेर तालुक्यातील आदर्श राजकारणी म्हणजे दाते सर, आम्ही राजकारन्यांबरोबर नसून दाते सरांचे काम निरपेक्षतेने, जन विकासाचे काम जोरात सुरू आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस माझा आशीर्वाद व शुभेच्छा!
कार्यक्रम प्रसंगी बोलताना सभापती दाते सर म्हणाले काटाळवेढा गावात माझ्या जिल्हा परिषद कालावधीमध्ये जवळपास दोन कोटी रुपयांची विकास कामे करून गावच्या प्राथमिक गरजा यामध्ये वस्त्यांकडे जाणारे कच्चे रस्ते, सि.डी. वर्क असतील पाणीपुरवठा लाईन, पाण्याची टाकी, पक्के रस्ते, आरोग्य सुविधा करण्याचा प्रयत्न केला. गावामध्ये दोन जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या इमारती मंजूर करून बांधकाम पुर्ण केले व एक अंगणवाडी इमारत मंजूर करून तिचेही बांधकाम पूर्ण झाले. यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांची बसण्याची कायमस्वरूपीची व्यवस्था झाली.हे गाव पहिल्यापासून शिवसेनेला मानणारे आहे पुढील काळातही काटाळवेढा, डोंगरवाडीचा विकास करण्यास कमी पडणार नाही, विकासाची काळजी करू नका,तुम्ही सांगितलेली सर्व कामे करून देण्याचा प्रयत्न माझा राहील. तुम्ही आम्हाला बोलावले आमचा सन्मान केला तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.
यावेळी ह भ प नामदेव महाराज घुले, माजी सरपंच ठका कडूसकर, सुदाम गाजरे, चेअरमन हरी डोंगरे, व्हा. चेअरमन रामदास गाजरे, लहू गुंड, लक्ष्मण गाजरे, भाऊसाहेब डोंगरे, विकास गाजरे, खंडू भाईक, अंकुश गुंड, बाळा गुंड, नाथा डोंगरे, रामदास डोंगरे, भाऊसाहेब गुंड, शरद गगे, भाऊ किसन गुंड, माधव भाईक, रेखा डोंगरे, अलका रामदास डोंगरे, कारभारी डोंगरे, ह भ प मंगेश डोंगरे, प्रकाश वाघ, अशोक डोंगरे, भाऊ शंकर डोंगरे, भास्कर डोंगरे, बाळू डोंगरे, अशोक श्रीपती डोंगरे, अशोक म्हतु डोंगरे, रघुनाथ गुंड, गोपीनाथ गुंड, लक्ष्मण डोंगरे, कैलास डोंगरे, संजय भाऊ गुंड, भाऊसाहेब कोकाटे, बाळासाहेब गुंड, भाऊ सुदाम गाजरे, श्रीधर बाबा विधवांस, बाळू गागरे, सभाजी गुंड, भाऊ हरिभाऊ गुंड, विजय सरोदे, बाळासाहेब सरोदे, म्हताराबा बबन गुंड, शाहिर रामदास गुंड, भाऊ बबन गुंड, गंगाधर गुंड, विठ्ठल शिंदे, संपत भाईक, दत्तू भाईक, सुदाम डोंगरे, भाऊसाहेब लामखडे, कामाचे ठेकेदार फारुख शेख, बबन वाळुंज, आकाश अहिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठका कडुसकर यांनी केले तर आभार रामदास गाजरे यांनी मानले.