इतर

भायगावात धरणग्रस्त आसराबाई आगळे यांना श्रद्धांजली

नितीमुल्ये सांभाळुन जीवन जगलेली माणसं गेली तरी त्यांचे विचारांनी चिरकाल राहतात- कॉ बाबा आरगडे


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
जीवन जगत आसताना नितीमुल्ये सांभाळुन जीवन जगलेली माणसं तुमच्या आमच्या तुन गेली तरी ती विचारांनी चिरकाल जीवंतच आसतात. अडानी किंवा शिक्षित असा समाजातील कोणताही घटक याला अपवाद ठरत नाही. या जगाचा एक दिवस सर्वानाच निरोप घेयचा आहे. याचे कायम स्मरण ठेवुन जीवन जगलं पाहिजे असे मत मांडताना त्यांनी सत् सत् विवेक बुद्धीने जीवन जगलं पहिजे असे मत जेष्ठ विचारवंत कॉ बाबा आरगडे यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यात भायगाव येथील धरणग्रस्त आगळे कुटुंबातील सदस्य स्व.आसराबाई नामदेव आगळे यांचे नुकतेच निधन झाले. याप्रसंगी श्रद्धांजली वाहताना कॉ आरगडे बोलत होते. जायकवाडी जलाशयाने विस्थापित झालेला खामगाव येथील आगळे कुदुंब गेली सहा दशकापूर्वी भायगाव येथे स्थायिक झाले. व याच ठिकाणी शेती हा मुख्य व्यवसाय करून आर्थिक घडी बसवली. आज माझ्या भागिनी आसराबाई याच्या निधनाने मनाला खुप वेदना झाल्या अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी लक्ष्मण महाराज नवथर, बाळासाहेब महाराज नवथर, भायगाव विकास संस्थेचे माजी अध्यक्ष जनार्दन लांडे, हरिचंद्र आढाव, माजी सरपंच संजय लांडे,दिलीप नवथर, डॉ.बबन शेळके, ज्ञानदेव आरगडे, विष्णु आढाव, मधुकर आरगडे, आप्णासाहेब आरगडे, पाराजी गोरे, प्रसाद नवथर, सखाराम लोखडे, परसराम चोपडे,संजय म्हसरुप, सजॅराव लिपणे, साईनाथ थोरे, रावसाहेब मोकाटे,शिवाजी आरगडे, जनार्दन गुंड, बाळासाहेब लांडे, हरिभाऊ पवार, संतोष लांडे, अदिनाथ लांडे, महादेव चापे, कैलास लांडे,शामराव सांवत,गणेश म्हसरुप, गंगाधर खिळे, तुषार जाधव,नामदेव आरगडे यांच्यासह आगळे परिवारातील भायगाव व खामगाव येथील सदस्य हजर होते.

-९/११ चा योगायोग

गेल्या सात वर्षापुर्वी साथ सोडून गेलेले याच कुदुंबातील नामदेव पुंजाजी आगळे यांचे वृद्धापकाळाने बुधवार दिनांक ९ / ११ / २o१६ रोजी सायंकाळी ४ वाजता निधन झाले होते. याच तारखेला म्हणजे बुधवार ९ / ११ / २०२२ रोजी पहाटे ४ वाजता आसराबाई नामदेव आगळे यांनीही सात वर्षानंतरही त्याच वार वेळ तारीखेला देह ठेवला.तारीख, वेळ व वार हा योगायोग जीवनभर एकमेकांना साथ दिल्यानंतरही सात वर्षानंतर पती आणि पत्नीच्या निधनानंतर जुळून आल्याने आनेकांनी आश्चार्य व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button