बेरोजगार युवक-युवतींसाठी ‘भव्य नोकरी महोत्सव’ चे आयोजन

नाशिक प्रतिनिधी :- ( डॉ. शेरूभाई मोमीन, )
:- पुणे मा.उपमहापौर,आदर्श समाज भूषण,, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नेते, श्री. दीपक राजे माधवराव पा. मानकर, यांच्या आज 6 मे 2023, वाढदिवसानिमित्त सर्व समर्थक सदस्य हितचिंतक कार्यकर्ते पदाधिकारी आणि परमस्नेही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने येत्या ६ मे २०२३ रोजी, सकाळी ९.०० वाजता कोथरूड येथील उत्सव मंगल कार्यालय येथे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी ‘भव्य नोकरी महोत्सव’ चे आयोजन करण्यात आले आहे.
रोजगार मेळाव्यात उद्योग व कंपन्यांमध्ये नोकरीची संधी तसेच स्टार्टअप व उद्योजकतेचे मार्गदर्शन युवकांना मिळणार आहे. क्षेत्र अथवा शिक्षण कुठलेही असो, या मेळाव्यात तरुणांना नक्कीच रोजगाराची संधी मिळेल. तरुणांचे भविष्य उज्ज्वल बनविण्याचा कायमचं आमचा मानस आहे. याचं अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती मा.श्री.दीपक राजे माधवराव पा. मानकर, अभिष्टचिंतन सोहळा सत्कार समिती कोथरूड जि. पुणे, यांच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे..