इतर

कोल्हार – घोटी राज्य मार्गावर कोकणगाव नजीक निझणेॅश्वर फाट्यावर दुचाकीचा अपघात!

संगमनेर प्रतिनिधी

: कोल्हार – घोटी राज्य मार्गावर असणाऱ्या निझणेॅश्वर फाट्यावर दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुचाकी वरून जाणारा एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली

शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. .

कोल्हार – घोटी राज्यमार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून शुक्रवारी दुपारी मांची फाट्यावर ट्रॅक्टर, पिकअप आणि दुचाकीच्या धडकेत तालुक्यातील वडगावपान येथील दोन सख्खे चुलत भाऊ ठार झाल्याची घटना ताजी असतानाच २४ तासात या रस्त्यावर तिसरा बळी गेला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील ७५ वर्षीय वृद्ध इसम हे कोकणगाव जवळील शिवापूर येथील आपल्या मुलीकडे राहत होते. ते काल सायंकाळी निझणेॅश्वर फाटा येथे रस्ता ओलांडत असताना लोणीकडून संगमनेरकडे जाणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत ७५ वर्षीय वृद्ध इसमाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला असून तो नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील असल्या हे समजते

. अपघात झाल्याच्या नंतर काही वेळातच राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या ताफ्यासह लोणीकडून संगमनेरच्या दिशेने येत होते. त्यांनी हा अपघात पाहिल्यावर आपल्या गाडीतून खाली उतरत अपघातातील जखमीला मदत करण्याच्या सूचना त्यांनी तेथे उपस्थित असणाऱ्या तालुका पोलिसांना केल्या. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाठवून मदत कार्य करण्यास सुचित केले.

दरम्यान कोल्हार-घोटी राज्य मार्गावर संगमनेर ते लोणी दरम्यान अपघाताची मालिका सुरूच असून शुक्रवारी दुपारी ट्रॅक्टर, दुचाकी आणि पिकअपच्या विचित्र अपघातात वडगावपान येथील कुळधरण बंधूंना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर २४ तासातच मांची फाट्याच्या पश्चिमेला असणाऱ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निझणेॅश्वर फाटा येथे काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला. दीड दोन महिन्यापूर्वी वडगावपान फाटा येथे डंपर आणि दुचाकीच्या धडकेत वडगाव लांडगा येथील एक आणि दुर्गापुर तालुका राहता येथील एक असे एकमेकाचे मावस भाऊ असणाऱ्या दोघांना आपला जीव गमवावा लागला होता.

         

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button