कळस येथील साईराज वाकचौरे कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित

अकोले प्रतिनिधी
शेतकरी पुत्र फाउंडेशनच्या वतीने युवा कृषी व्यावसायिक व मार्गदर्शक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेबद्दल कळस येथील साईराज वाकचौरे याला कृषिरत्न पुरस्काराने विशेष सन्मान करण्यात आला.
नगर येथे आयोजित सोहळ्यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पद्मश्री सौ राहीबाई पोपरे (बीजमाता) ,पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार (आदर्श सरपंच) हिवरे बाजार, श्री कैलास राऊत, श्री किशोर भणगे अध्यक्ष युवा काँग्रेस नेवासा यांच्या हस्ते कृषी, उद्योजक, शैक्षणिक, सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांना नॅशनल ग्रेट अचिवर्स अवॉर्ड 2022 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
साईराज वाकचौरे यांनी कृषि सेवा केंद्राच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. यु ट्यूब वर शेतीचे मार्गदर्शन करत आहेत. आपण केलेले कार्य हे आम्हाला प्रेरणा व ऊर्जा देणारे आहे. आपण आपल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी शेतकरी पुत्र फाउंडेशन आयोजित नॅशनल ग्रेट अचिवर्स अवॉर्ड 2022 हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शाल श्रीफळ ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी शेतकरी पुत्र फाउंडेशन अहमदनगर महाराष्ट्र संस्थापक, अध्यक्ष अनिकेत अशोक शेळके, उपाध्यक्ष, कृष्णा पाठक, सचिव रोहन ढेरे ,सहसचिव सौरभ निकम, सल्लागार ऋषिकेश पाठक, खजिनदार शुभम सुद्रिक यांनी आयोजन करण्यात आले होते.