पारनेर शहरात होणार आनोखी रामनवमी साजरी !

पारनेर शहारात निघणार प्रभू श्री.रामचंद्रांची भव्य मूर्तीची शोभायात्रा !
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
ऐतिहासिक, सामाजिक तसेच धार्मिक परंपरेने राज्यात ज्ञात आसनारे व पराशर ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पारनेरची भूमी तसेच बारा ज्योतिर्लिंग आसनारे श्री.क्षेत्र प्रती काशी समजले जानारे पारनेर शहर.या शहरात सामाजिकतेचे व जातीय सलोखा जतन करणारे मानवतेचे दर्शन नेहमीच घडत आसते.
याही वर्षी सालाबाद प्रमाणे पारनेर नगरपंचायतचे सर्व नगरसेवक,शहरातील सर्व युवक सहकारी मीत्रांचे सर्व मंडळे व समस्त शहरवासियांच्या पुढाकारातुन पारनेर शहरात सर्व पक्षीय व सर्वधर्मीय एक गाव एक उस्तव सोहळा पारनेर शहरा मध्ये विवीध धार्मिक उपक्रमांनी मंगलमय व भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे.
प्रभु श्री.रामांची अकरा फुटी भव्यमूर्तीचे खास आकर्षण या उत्सव सोहळ्यात असून पारनेरच्या बाजारपेठेतून पारंपारिक वाद्याच्या गजरात समस्त पारनेर शहरवाशीयांच्या उपस्थितीत प्रभू श्री.रामांच्या भव्य मूर्तीची सायंकाळी 5 ते 7 वा.भव्य शोभायात्रा निघणार असून,सायंकाळी साडेसात वाजता महाआरतीचे आयोजन पारनेर येथील राम मंदिरात करण्याचे योजिले आहे.
पारनेर शहरासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर श्री.राम भाविक भक्त या मंगलमय भक्ती सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत समस्त पारनेर वाशीयांनीही ” एक गाव एक उत्सव ” या आनोख्या संकल्पनेतुन साकारलेल्या या भव्य दिव्य शोभायात्रेस व महाआरतीस उपस्थित राहून या भक्तीमय सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन पारनेर नगरपंचायतचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व समस्त नगरसेवक,नगरपंचायत पारनेर यांचेकडून सर्व भाविक भक्तांना व शहरवासीयांना करण्यात येत आहे.