परदेशी बनावटीचे पिस्तुल बाळगणारे संगमनेरचे तीन आरोपी पालघर जिल्ह्यात गजाआड!

आरोपींकडून आठ लाखाचा मुद्देमाल जप्त
संगमनेर प्रतिनिधी
आगामी गुजरात विधानसभा निवडणुक २०२२ च्या अनुषंगाने श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच प्रभारी अधिकारी यांची जिल्ह्यातील अवैध धंदे तसेच कायदा व सुव्यवस्था याविषयी बैठक बोलावून मार्गदर्शन व सुचना दिल्या आहेत. तसेच गुजरात राज्याला लागून असलेल्या पोलीस ठाणे हद्दीत बॉर्डर चेकपोस्ट तयार करुन विशेष नाकाबंदी लावण्याबाबत सुचना दिल्या त्या अनुषंगाने दि.२७/११/२०२२ रोजी तलासरी पोलीस ठाणे हद्दीत उधवा-कोदाड रोडवर दळवीपाडा फाटा ता. तलासरी, जि. पालघर येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. सदर नाकाबंदी दरम्यान उधवा बाजुकडुन येणारी पिकअप गाडी क्र.एम.एच ४१/जी ३२७३ हिला थांबवुन चेक केली असता त्यात आरोपी क्र.
१) वय २६ वर्षे रा. कुरण रोड संगमनेर ता. संगमनेर जि. अहमदनगर, आरोपी क्र. २) वय २८ वर्षे रा.कुरण रोड संगमनेर ता. संगमनेर जि. अहमदनगर, आरोपी क्र. ३) सुमित लाजरस खरात वय ३० वर्षे, रा. कुरण रोड, महादेव वस्ती संगमनेर जि. अहमदनगर यांनी आपसात संगनमत करुन त्यांचे कब्जात एक पिस्टल (कट्टा) व दोन जिवंत काडतुसे विना परवाना कब्जात बाळगुन मा. जिल्हाधिकारी, पालघर यांचेकडील मनाई आदेश क्र.गृह/का-१/टे/मनाई आदेश/एस.आर ५४/२०२२ दिनांक-२१/११/२०२२ अन्वयेचे आदेशाचे उल्लंघन केले आहे म्हणून मिळून आले.
नमुद आरोपींकडून खालील वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१) २०,०००/- रुपये किमतीचे MADE IN U.S.A. मार्क असलेले एक पिस्टल (कट्टा) त्यास पकडण्याच्या ठिकाणी दोन्ही बाहेरील बाजुला लाकडी प्लेट स्क्रु ने फिट केलेल्या असून सदरचे पिस्टल सुमारे ६ सेमी लांबीचे व सुमारे साडेचार फुट रुंदीचे कि.सु. २) ७००/- रुपये किमतीच्या kf ७.६५ मार्क असलेले पिस्टल (कट्टा) चे जिवंत दोन काडतुसे प्रत्येकी ३५० रुपये किंमतीचे कि.सु. ३) ८,००,०००/- रुपये किमतीची सफेद रंगाची पिकअप क्र.एम.एच ४१/जी ३२७३ हिस काळी ताडपत्री बांधलेली तीचा इंजीन नं.जी जी ९१ एम
८६३५७ व चेसीज नं.एम ए १ झेड एन २ जी जी ९१ एम ८७९४८ असा असलेली जु.वा. कि.सु. एकूण ८,२०,७००/- रुपये. सदर बाबत तलासरी पोलीस ठाणे येथे ॥ ३८६/२०२२ भा.दं.वि.सं.कलम ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) (३),१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुढिल तपास हा पोलीस उपनिरीक्षक समिर लोंढे हे करत आहेत. सदरची कारवाई हि श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर, श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/अजय वसावे, प्रभारी अधिकारी तलासरी पोलीस ठाणे, व तलासरी पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे.