आरमर हेलिक्स फाउंडेशन संचलित इंडिजिनस फार्म, गोतीर्थ: देशी गीर गायींच्या संवर्धनासाठी भूमिपूजनाचा मंगल सोहळा

आरमर हेलिक्स फाउंडेशन संचलित इंडिजिनस फार्म, गोतीर्थ: देशी गीर गायींच्या संवर्धनासाठी भूमिपूजनाचा मंगल सोहळा
26 जानेवारी 2025 रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमयी दिवशी, आरमर हेलिक्स फाउंडेशन संचलित इंडिजिनस फार्म गोतीर्थ, देशी गीर गायींच्या संवर्धन केंद्राच्या अंबासन येथील उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याला अनेक मान्यवर व पशुप्रेमी उपस्थित राहिले.

या पवित्र कार्यासाठी भूमिपूजन मा. डॉ. बाबुराव र नरवाडे साहेब, प्रादेशिक सहआयुक्त नाशिक पशुसंवर्धन विभाग नाशिक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यांच्यासोबत मा. डॉ. धर्माधिकारी साहेब, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, नाशिक व डॉ. प्रशांत पाटील, वैरण विकास अधिकारी, नाशिक डॉ.देवानंद ना पाईकराव, पशुधन विकास अधिकारी सटाणा डॉ. उज्वलसिंग पवार, सहा आयुक्त पशुसंवर्धन विभाग सटाणा, डॉ. शुभम घुले, डॉ. दिपाली पठाडे पशुधन विकास अधिकारी आणि गोपालरत्न श्री. राहुल मनोहर खैरनार उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एका नव्या ऊर्जा आणि प्रेरणेची जोड मिळाली.
देशी गीर गायींच्या संवर्धनासाठी एक पवित्र संकल्प:
भारतीय गायींच्या संवर्धनासाठी अंबासन येथील हे केंद्र शाश्वत शेती आणि पर्यावरण संरक्षणासाठी एक नवा मापदंड उभारेल, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. भूमिपूजनाच्या या मंगल प्रसंगी सहआयुक्त मा. डॉ. नरवाडे साहेब म्हणाले, “देशी गीर गायींचे संवर्धन म्हणजे केवळ एक चळवळ नाही, तर ती भारताच्या शेती, पर्यावरण, आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील क्रांती आहे.”
मा. डॉ. धर्माधिकारी साहेब यांनी गौशाळेच्या योजनांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आणि सांगितले की, “ही गौशाळा भविष्यात गीर गायींच्या वंशवृद्धी, दुग्धोत्पादन, आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी एक आदर्श ठरेल.”

संवर्धन केंद्राचे उद्दिष्ट:
हे केंद्र गीर गायींच्या संवर्धनासाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब करेल. त्यात IVF तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय सुविधा, गोशाळा व्यवस्थापन प्रशिक्षण आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या योजना राबविण्याचा आरमर हेलिक्स फाउंडेशनचा मानस आहे. या केंद्रातून जैविक शेतीसाठी खतनिर्मिती, पर्यावरण पूरक गोमूत्र व गोमय उत्पादने तयार होणार आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी आरमर हेलिक्स फाउंडेशनच्या या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी या केंद्राचा मोठा वाटा असेल, असा विश्वास व्यक्त केला.
“गोमाता केवळ श्रद्धेचा भाग नसून शाश्वत शेती आणि जीवनशैलीचा आत्मा आहे.” या विचारांनी प्रेरित होऊन उभे राहणारे हे केंद्र भविष्यात एक आदर्श प्रकल्प ठरेल.