इतर
सोनई पोलीसांची अवैद्य धंद्यावर धडक कारवाई

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
ता.१३: सोनई पोलीसांनी आज सायंकाळी
पानेगाव, पांढरीपुल व खेडलेपरमानंद येथील अवैद्य
धंद्यावर कारवाईचा धडक करुन तीन जणावर
कारवाई केली.
खेडलेपरमानंद येथील जिल्हा परिषद शाळेजवळ साडेआठ लाख रुपये किंमतीचा टॅम्पो (एम.एच १७ बी . वाय ८८ ९५) व एक ब्रास चोरीची वाळू जप्त करुन गणेश साहेबराव शिंदे वय – २२ रा. खेडलेपरमानंद यास अटक करण्यात आली. पांढरीपुल येथे देशी दारु व मटका अड्ड्यावर छापा टाकून संतोष भाऊसाहेब कदम व पद्मावती मटका चालक शाम सुमंत भालेराव वर गुन्हा दाखल करण्यात आला.पानेगाव येथे देशी दारु विक्री प्रकरणी चंद्रकांत हौशीराम जंगले वर गुन्हा दाखल करण्यात आला.
. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी.सांगितले