शिक्षकभारती संघटनेचे अहमदनगर शिक्षणाधिकारी दालनासमोर धरणे आंदोलन.

अकोले/प्रतिनिधी-
अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत व्हावे. हा प्रमुख सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन कुठलाही राजकीय हस्तक्षेप नसणारी संघटना म्हणजे शिक्षकभारती संघटनेने अहमदनगर शिक्षणाधिकारी दालनासमोर धरणे आंदोलन केले. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष जिल्ह्यातून आले होते.राष्ट्रीयकृत बँकेत पगार होणे हे कर्मचारी ठरवतात.परंतु आपल्या अहमदनगर मध्ये वेगळेच घडताना दिसत आहे.राष्ट्रीयकृत बँकेत पगारामुळे कर्मचारी कुटुंबाला ४० ते ७० लाखापर्यंत अपघाती विमा मिळतो आहे. विमान अपघातात दोन कोटी पर्यंत विमा मिळतो आहे. आणि स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेज अंतर्गत(सी.एम.पी.)प्रणाली द्वारे तो महिन्याच्या एक तारखेला पगार होतो. त्यामुळे कुठल्याही सोसायटीचे, बँकेचे,कर्जाचे अतिरिक्त व्याज व दंड भरावा लागत नाही. तसेच राष्ट्रीयकृत बँकेत ओडी सुविधा,झिरो बॅलन्स,गृह कर्ज,वाहन कर्ज, पर्सनल लोन अशा विविध सुविधा राष्ट्रीयकृत बँकेत मिळतात.त्यामुळे कर्मचाऱ्यांना इंटरनेट बँकिंग सुविधेमुळे बँकेत जाणे गरजेचे नसते.या तुलनेत इतर खाजगी बँकात पगार झाल्यामुळे अपंग कर्मचाऱ्यांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते.बँकेचे कर्मचारी व्यवस्थित बोलत नाही.पगार मुख्याध्यापकांच्या खात्यावर आल्यामुळे ४ ते ५ दिवस पुन्हा उशिर होतो. त्याचा फायदा बँकेला देखील आहे.त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे वाहन कर्ज, गृह कर्ज,पर्सनल लोन मिळत नाही एका दिवसाला व्यवहाराच्या मर्यादा आहे.सदर खाजगी बँका या 30 लाखापर्यंत ग्रुप विमा देतात असे पत्र दिले.परंतु ग्रुप विमा हा सर्व सभासदांसाठी आहे.त्याच्या अटी शर्ती माहीत नाही.तो कर्मचाऱ्यांना मिळेलच याची शाश्वती नाही. अशा अनेक समस्या असल्याने शिक्षक भारती संघटनेचे राज्यसचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष रामराव काळे, सरचिटणीस महेश पाडेकर, माध्यमिक विभागाचे कार्यवाह तथा नेवासा तालुक्याचे तालुकाध्यक्ष संजय भुसारी, शिक्षक भारती विनाअनुदान विरोधी कृती समितीचे महिला राज्याध्यक्षा रूपालीताई कुरुमकर, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुमंत शिंदे, दक्षिण विभाग जिल्हा उपाध्यक्ष सचिन जासूद, उत्तर विभाग उपजिल्हाध्यक्ष दादासाहेब कदम,अकोले तालुकाध्यक्ष संपत वाळके, उच्च माध्यमिक विभागाचे सल्लागार बाबासाहेब तांबे,श्रीगोंदा तालुकाध्यक्षा रूपालीताई बोरुडे, श्रीरामपूर महिला तालुकाध्यक्षा कल्पनाताई चौधरी, सहसचिव संतोष निमसे, नेवासा उच्च माध्यमिक तालुकाध्यक्ष बाबासाहेब चौधरी,जिल्हा कार्यकारणी सदस्य सोमनाथ खाडे, कोपरगाव तालुकाध्यक्ष योगेश पाटील, सचिव नरेंद्र लहिरे,राहुरी तालुका अध्यक्ष संजय तमनर,शेवगाव तालुका अध्यक्ष माफीज इनामदार,सल्लागार प्रवीण मालुंजकर, विजय पांडे,एम.बी.निफाडे,ए. एन.बांद्रे,एस.पी.वांडरे, आर.जी. गायधने आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक प्रशिक्षक संघाचे राज्याध्यक्ष प्रशांत म्हस्के यांनी प्रत्यक्ष येऊन आंदोलनाला मार्गदर्शन करून पाठिंबा दिला. तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष छगनराव पानसरे यांनी देखील आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे. सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका अध्यक्ष यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून घोषणा दिल्या. यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस व माध्यमिक विभागाचे वेतन अधीक्षक रामदास मस्के यांनी प्रत्यक्ष आंदोलनाला भेट देऊन मार्गदर्शन केले व लेखी पत्र दिल्यामुळे आंदोलन स्थगित झाले. शिक्षणाधिकारी यांनी प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई येथे आपल्या आंदोलनाची माहिती त्वरित आजच पाठवली जाईल असे आश्वासित करून राष्ट्रीयकृत बँकेत पगार होण्यासाठी पाठपुरावा करू असे सांगितले.