इतर

पोपटराव पवार, प पु रामगिरी महाराज यांचे हस्ते डॉ.सोमण सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित !

शिर्डी प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागात 5 दशकाहून अधिक काळ वयाच्या 80 व्या वर्षीही अविरत सेवा देणारे डॉ एस के सोमण यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सरला बेटाचे मठाधीपती प.पु. रामगिरी महाराज व आदर्श गाव हिवरे बाजार चे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते

   

कोतुळ येथील डॉ सुभाष केशव सोमण यांना सेवा गौरव पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे हे होते. शिवव्याख्याते प्रदीप कदम, विभागीयध्यक्ष दशरथ चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, आनंद दिघे इंग्लिश स्कुल चे सचिव अनिल राहणे उपस्थित होते.

डॉ सोमण यांनी अकोले तालुक्यातील आदिवासी भागात पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ वैद्यकीय सेवा केली, हजारो महिलांचे सुखरूप बाळंतपण केले , लाखो रुग्णांवर उपचार केल्याने खऱ्या अर्थाने ते आदिवासी भागाचे धन्वंतरी ठरले वयाच्या 80 व्या वर्षी आजही अव्याहतपणे ते रुग्ण सेवा करत आहेत

     

1970 मध्ये बी जे मेडिकल कॉलेज मधून एम बी बी एस शिक्षणाची पदवी घेऊन आदिवासी भागातील जनतेची सेवा करण्याचे व्रत त्यांनी अंगीकारले

1970 ला सुमारे 4 हजार लोकसंख्या असणाऱ्या कोतुळ गावात वैद्यकीय सोयी सुविधा फारशा नव्हत्या कोतुळ पंचक्रोशीत असणाऱ्या आदिवासी गावे खेडोपाड्यात आरोग्य सेवा नव्हती ,जडी बुटी ,जादू टोना ,ची पाळेमुळे खोल वर रुजलेले असताना आशा परिस्थिती त्यांनी लोकांसाठी रुग्ण सेवा सुरू केली त्यावेळी खरे तर ते जनतेसाठी देवदूतच ठरले
तोकडी आरोग्य सुविधा रस्ता, दळणवळण अपुरे ,पायी व सायकल प्रवास करत खेडोपाडी रुग्णावर उपचार करणे खरे तर कठीण काम होते प्रसंगी नदी ओढे नाले पार करून रुग्णावर उपचार केले

रुग्ण सेवा करताना त्यांनी कधी पैशाला महत्व दिले नाही रुग्ण बरा करण्याच्या आनंदात समाधान मानत ते आजही ही सेवा करत आहे या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने त्यांच्या कार्याची दखल घेतली

चांगले विचार ,साधी राहणी पैसा संपत्ती ची लालसा न ठेवता साधी रहानीमान असणारे डॉ सोमण यांनी एम बी बी एस असतानाही शराहत दवाखाना न थाटता आदिवासी भागात गोर गरिबांवर उपचार करण्यात आयुष्य खर्ची घातले अशा या कृतार्थ जीवनाचा गौरव करून डॉ एस के सोमण डॉ सौ नीलिमा सोमण यांना सन्मानपत्र स्मृती चिन्ह देऊन सपत्नीक सेवा गौरव पुरकार प्रदान करण्यात आला
या वेळी जिल्हा भरातून अनेक मान्यवर उपस्थित होते


— – ———–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button