नाशिक

बाभूळगाव(ता.येवला)येथील हॉलीबॉल स्पर्धेत ,तांदुळवाडी संघाची चमकदार कामगिरी!

नाशिक–एस.एन.डी.सी.बी.एस.ई स्कूल बाभूळगाव (ता.येवला) या ठिकाणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित येवला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत आज हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये संपूर्ण तालुक्यातले १४,१७,१९ वर्षे वयोगट मुले-मुली ह्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचा निकाल:

१४ वर्षे वयोगट मुले विजय संघ तांदुळवाडी एस.एन.डी.सी.बी. एस.ई स्कूल उपविजेता मुली तांदुळवाडी १७ वर्ष वयोगट तांदुळवाडी संघ विजयी एस.एन. डी इंग्लिश मीडियम स्कूल उपविजेता तर १९ वर्षे वयोगट कांचन सुद्धा इंटरनॅशनल स्कूल विजेता ठरला आहे.
याप्रसंगी एस.एन.डी.सी.बी एस.ई स्कूलचे प्राचार्य प्राची पटेल,फार्मसी कॉलेज प्राचार्य कोलकटवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
स्पर्धेच्या उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन संगीता धारणकर यांनी केले.
स्पर्धेचे संयोजन क्रीडा शिक्षक अमोल गायकवाड यांनी केले
स्पर्धेच्या यशस्वीत्यासाठी करिष्मा पठाण,कोमल गिरी,कृष्णा पवार,संतोष खोकले,कृष्णा कोल्हे,सविता गांगुर्डे,पूजा धुमाल,अश्विनी धुमाळ,अर्चना राठोड,संदीप दानेकर,भारती साप्ते,अमोलराजगुरु,संदीप कापसे शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
विजयी संघाचे तालुका क्रीडाधिकारी महेश पाटील,क्रीडा संयोजक नवनाथ उंडे,अमोल राजगुरू (एन.आय.एस कोच) यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button