एम.एन देशमुख महाविद्यालयात बिरसा मुंडा जयंती साजरी

अकोले प्रतिनिधी
ब्रिटिश सत्तेविरोधी भूमिका घेणारे पहिले आदिवासी क्रांतिकारक धरती आबा बिरसा मुंडा होते. ब्रिटिश सत्तेला प्रखर विरोध करणारे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी जल,जंगल आणि जमीनी च्या संरक्षणासाठी त्याग करणारे आदिवासी क्रांतिकारक आणि समाजाचा इतिहास सर्वांसमोर यावयास हवा असे प्रतिपादन आदिवासी समाजाचे अभ्यासक डॉ. एल.बी काकडे यांनी केले.
उलगुलान चळवळीचे खरे प्रवर्तक बिरसा मुंडा च होते, हा एक वंचित समाजाचा इतिहास आहे असे ही ते म्हणाले.अॅड्. एम.एन देशमुख कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बिरसा मुंडा जयंती निमित्ताने ते बोलत होते.
राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बी के थोरात यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ बी वाय देशमुख यांनी बिरसा मुंडाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तर आभार प्रा. डाॅ.गिते वाल्मिक यांनी मानले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातील प्रा. डाॅ. वाळे एल एल ,प्रा. कडलग एस डी., प्रा. आरोटे जे डी, डाॅ.शिंदे एम बी, काकडे के जे,पवार बी एम प्रा.होले बी आर , डाॅ. करंडे पी टी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
———-
