राज्य सरकारच्या निषेधार्थ संगमनेरात भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण.!

संगमनेर : (प्रतिनिधी )
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुर्तता करून मध्यप्रदेश सरकारने ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण टिकवले, परंतु महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुर्तता न करता वेळकाढूपणा करत ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण घालवले, ओबीसी समाजाचा राजकीय घात करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपा ओबीसी मोर्चा, संगमनेरच्या वतीने संगमनेर प्रांत कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने १३ डिसेंबर २०१९ रोजी राज्य सरकारला ट्रिपल टेस्ट करून इंपेरीकल डेटा न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते, त्यासाठी आयोग स्थापन करण्याच्या सुचना मा न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या होत्या, परंतु राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यासच उशीर केला, आणि आयोगाला निधी उपलब्ध करुन दिला नाही म्हणून महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केले, मध्यप्रदेश सरकारने मा न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रिपल टेस्ट करून इंपेरीकल डेटा न्यायालयात वेळेत सादर केला परिणामी मध्यप्रदेशात ओबीसींचे गेलेले राजकीय आरक्षण पुनःस्थापित होऊ शकले, महाराष्ट्रात ओबीसींच्या रद्द झालेल्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी ठाकरे पवार सरकार असल्याचा घणाघात यावेळी बोलताना ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर यांनी केला.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मा श्री बाळासाहेब गाडेकर, महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव नंदकुमार जेजुरकर, संगमनेर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष डॉ अशोक इथापे, भाजपाचे संगमनेर शहर अध्यक्ष ॲड श्रीराम गणपुले, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस भारत गवळी, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष दिपक भगत, भाजपा ओबीसी मोर्चा संगमनेर शहर अध्यक्ष संपत गंलाडे, भाजपा ओबीसी मोर्चा संगमनेर तालुका अध्यक्ष ॲड गोरक्ष कापकर, भाजपा संगमनेर तालुका सरचिटणीस वैभव लांडगे, भाजपा संगमनेर शहर सरचिटणीस आणि माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जहागिरदार, भाजपा व्यापार आणि उद्योग आघाडीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष शिरीष मुळे, भाजपा किसान मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सतिश कानवडे, भाजपा संगमनेर तालुका सरचिटणीस भारत फटांगरे, भाजपा संगमनेर शहर सरचिटणीस भगवान गिते, भाजपा संगमनेर शहर सरचिटणीस संजय नाकील, भाजपा संगमनेर शहर उपाध्यक्ष कैलास भरीतकर, संगमनेर शहर भाजपाचे माजी अध्यक्ष सिताराम मोहरीकर, संगमनेर शहर भाजपाचे उपाध्यक्ष सुनिल खरे, भाजपाच्या संगमनेर शहर उपाध्यक्ष सौ कांचनताई ढोरे, भाजपा संगमनेर शहर सचिव मनोज जुंदरे, राहुल भोईर, दिलीप रावळ, भाजपा युवा मोर्चा संगमनेर शहर अध्यक्ष दिपेश ताटकर, भाजपा अभियंता आघाडीचे उत्तर नगर
जिल्हाध्यक्ष हरीश चकोर, भाजपा ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव खेमनर, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर नगर जिल्हा सचिव शिवकुमार भंगिरे, भाजपा ओबीसी मोर्चाचे संगमनेर शहर उपाध्यक्ष भगवान कुक्कर, ओबीसी मोर्चा संगमनेर शहर सरचिटणीस बालाजी लालपोतु, प्रशांत वाडेकर, ओबीसी मोर्चा राहाता तालुकाध्यक्ष स्वानंद रासने, राहाता तालुका भाजपा ओबीसी युवा मोर्चा अध्यक्ष जितेंद्र माळवदे, संगमनेर शहर भाजपा उपाध्यक्ष शाम कोळपकर, संपत गेठे, नवनाथ वावरे, कोंडाजी कडनर, अशोकराव कानवडे, बुवाजी खेमनर, पप्पु तेजी, शाम कासार, साहेबराव वलवे, ॲड संदिप जगनर, संतोष भालसिंग, भाजपा संगमनेर कार्यालयीन प्रमुख संतोष पठाडे, विकास गुळवे आदी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.