जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवणार : डॉ. दिपक आहेर

मातोश्री सायन्स कॉलेजमध्ये आरोग्य शिबिर
पारनेर/प्रतिनिधी :
आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मातोश्री हॉस्पिटल कर्जुले हर्या यांच्या माध्यमातून मातोश्री सायन्स कॉलेज येथे बुधवार दि. २८ सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत आरोग्य तपासणी करत औषधोपचार करण्यात आले. दरम्यान मातोश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून विद्यार्थीवर्ग तसेच ग्रामीण भागातील रुग्णांसाठी असे आरोग्य शिबिरे नेहमीच राबविले जातात. डॉ. दीपक आहेर मातोश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून असे उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने जनसेवा करत आहेत. कोविड काळामध्ये मातोश्री हॉस्पिटल ने अनेक गोरगरीब कोरोनाग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे पारनेर तालुक्यामध्ये राबविली आहे. नेहमीच विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर घेऊन मातोश्री हॉस्पिटलने समाज उपक्रम राबविले आहेत. मातोश्री सायन्स कॉलेजमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी डॉ. आहेर म्हणाले मातोश्री हॉस्पिटल हे तालुक्यातील ग्रामीण भागामधील एक सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून आदिवासी गरीब सर्वसामान्य रुग्णांवर अल्प दरामध्ये उपचार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून आरोग्य शिबिरे घेऊन विद्यार्थी तसेच सर्वसामान्य गरीब कुटुंबातील रुग्ण यांना आधार देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना या शासकीय योजना हॉस्पिटलच्या माध्यमातून पारनेर सारख्या ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणे राबविण्याचा आमचा मानस आहे. आज मातोश्री सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विद्यार्थी वर्गाला सवलतीच्या दरात उपचार करून मातोश्री हॉस्पिटल मोफत सेवा देत आहे.
सदर शिबिरासाठी डॉ. श्वेतांबरी आहेर, डॉ. विनायक दारकुंडे, डॉ सौ.दारकुंडे, डॉ. स्वाती पठारे, व प्राचार्य डॉ. धनश्री होळकर यांनी मोलाचे सहकार्य केले. या कामी आरोग्यमित्र धनंजय आल्हाट व प्रदीप गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या कमी संस्थेचे सचिव किरण आहेर व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. अशी माहिती संस्थेचे रजिस्टर यशवंत फापाळे यांनी दिली .