पत्रकारांनी एकत्र राहिले पाहिजे — संजय गोपाळे

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकारांचा पुष्पगुच्छ व पत्रकारितेचे प्रतीक असलेले अस्त्र पेन देऊन सन्मान सत्कार करण्यात आला .यावेळी सर्व पत्रकारांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे तालुका अध्यक्ष संजय गोपाळे यांनी सांगितले
.
भारतातील स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारितेचे प्रतीक म्हणून दरवर्षी १६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो. आज संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकारांना गुलाबाचे फुल आणि एक पेन देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संघटनेचे जेष्ठ सदस्य भारत पडवळ यांनी आपले मत मांडताना सांगितले की, आपण पत्रकार आहोत आपला समाजाला उपयोग झाला पाहिजे, ज्या पत्रकारांनी पत्रकारितेसाठी आपले आयुष्य घातले, त्यांचा अनुभव नेहमी आपल्या पाठीशी ठेवा , त्यामुळेच आज आपण पत्रकार दिनाचे औचित्य साधून एकत्र आलो असल्याचे ही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष सोमनाथ काळे, अध्यक्ष संजय गोपाळे, सचिव अमोल मतकर, संजय साबळे, भारत रेघाटे, भारत पडवळ, सतीश आहेर, सुखदेव गाडेकर यांच्यासह सदस्य हजर होते.