रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र संघटक पदी रमेश शिरकांडे यांची तर जिल्हा उपाध्यक्षपदी सावळेराम गायकवाड यांची निवड

अकोले प्रतिनिधी
रिपब्लिकन पक्षाची अहमदनगर जिल्ह्याची बैठक रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली .
रमेश शिरकांडे यांच्या सामाजिक कार्याची दखल पक्षाने घेतली आहे . वाशेरे गावचे सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पद, गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपद, जिल्हा संघटक पद, आदी विविध पदांवरती कामं केलेले आहे . पदाच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचे काम शिरकांडे यांनी केले आहे .त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल देत त्यांची जिल्हा संघटक पदावरून बढती देत उत्तर महाराष्ट्र संघटक पदी निवड करण्यात आली आहे .
तर डोंगरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाषचंद्र बोस पतसंस्थेचे नूतन व्हा चेअरमन सावळेराम गायकवाड यांची रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे . या पूर्वी सावळेराम गायकवाड हे अकोले तालुक्यात पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते . त्यांच्याही कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा कार्यकारिणीत घेऊन बढती देण्यात आली आहे . शिरकांडे व गायकवाड यांच्या नावाची घोषणा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केली .
तर निवडीचे पत्र जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी प्रदान केले . रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तीन फेफ्रुवारी रोजी कोपरगाव येथे येणार आहेत .या दौऱ्याच्या अनुशंगाने नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती . पक्षाचे ध्येय धोरण, येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा करण्यात आली . रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा भेटला पाहिजे या साठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र थोरात यांनी सांगितले तर संपर्क प्रमुख यांनी सांगितले की नगर जिल्हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असल्याने शिर्डी मतदार संघावर आपलाच दावा असल्याचे सूतोवाच केले आहे .
अध्यक्षीय मनोगतात विजयराव वाकचौरे यांनी सांगितले की शिर्डी बरोबर दक्षिण नगर जिल्ह्यात पक्षाची पकड अधिक मजबूत करावी .उमेदवार कुणीही असुद्या त्याचे भवितव्य कार्यकर्ते ठरवतील . जो रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करेल त्याचाच सन्मान कार्यकर्ते करतील . या बैठकीला दक्षिण नगर जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे , राज्याचे नेते दिपक गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुनिल शिरसाठ, अकोले तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे, युवा नेते किशोर शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, नेवासा तालुकाध्यक्ष सुशिल धायजे, कोपरगाव तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे, राहता तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, , श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, पारनेरचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, जामखेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शेवंगावचे तालुकाध्यक्ष सतीश मगर, मुस्लिम आघाडीचे आयुब पठाण, अहमदनगर शर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.