आमदार शिवाजीराव कर्डिले , सुजित झावरे पाटील यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट!

गायरान जमीन अतिक्रमण संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करणार -उपमुख्यमंत्री
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
– नगर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत शिवाजीराव कर्डिले , सुजित झावरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री मा. फडणवीस यांना तालुक्यातील सर्व शेतकरी व सामान्य नागरिकांच्या वतीने सर्व माहिती मांडली. सदर जागेत अत्यंत गोरगरीब लोकांची घरे असून पिढ्यान् पिढ्या वास्तव्य असणाऱ्या सर्वसामान्याची घरे उद्ध्वस्त होणार आहे.
पारनेर – नगर तालुक्यात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात असून त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. सदर निर्णयामुळे शेतकरी व सर्व सामान्य नागरिक अत्यंत हवालदिल झालेला असून चिंतेने त्यांना झोप सुद्धा येत नसल्याचे यावेळी दोघांनीही मा. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले व पारनेर – नगर तालुक्यातील सर्व सामान्य शेतकरी व नागरिकांच्या वतीने सदर गायरान जमिनी बाबत राज्य सरकारच्या वतीने मा. सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणेबाबतचे निवेदन देण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रक फडणवीस म्हणाले की, गायरान जमीन अतिक्रमणाबाबत मा. सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिकेचा मसुदा महाराष्ट्र राज्य सरकारकडून तयार झालेला असून त्याला स्थगिती देण्याबाबतचे सर्व प्रयत्न केंद्र व राज्य सरकार करणार आहेत.