साहेब तुम्ही शंभरी पार करा बाल चमुं दिल्या माजीमंत्री पिचड यांना शुभेच्छा!

अकोले, प्रतिनिधी
साहेब तुम्ही शंभरी पार करा अशा शुभेच्छा बाल चमुनी देत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना विविध रंगाची गुलाबपुष्प देऊन शुभेच्या दिल्या.
माजी मंत्री मधुकरराव पिचड गेली दीड महिन्यापासून आजारी होते मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारा नंतर ते नुकतेच राजूर येथे आले.ते आल्याचे कळताच अनेक हितचिंतक त्यांना भेटण्यासाठी गेले.त्याच वेळी राजूर येथील समर्थ विद्यालय च्या विद्यार्थिनी बाल दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री पिचड यांच्या निवासस्थानी पोहचल्या प्रत्येक विद्यार्थिनी हातात गुलाबपुष्प घेऊन पदस्पर्श करत साहेब लवकर बरे व्हा,शंभरी पार करून तुमच्या शंभरी ला आम्हाला सत्कार करण्याची संधी मिळू द्या अशी परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य लाभो असा शुभेच्या दिल्या त्यावेळी श्री पिचड भावूक होते
चांगले शिक्षण घ्या मोठ्या व्हा देशाच्या विकासाला हातभार लावा असे आशीर्वाद देत मुलांना चॉकलेट दिले.वैष्णवी वालझाडे, खुशबू तांबोळी, माही पवार,अलनाज मनियार ,अक्षरा लहमगे,कल्याणी मुतडक, मुनाफ मनियार,समर्थ मुतडक, साई मुतडक, कार्तिक भडांगे अनिकेत मुतडक . शिक्षक सुनीता पापळ,मिरा नरसाळे,अनिल नाईकवाडी,भीमाशंकर तोरमल आदींची उपस्थिती होती