एकलव्य रेसिडेन्सीयलचा हँडबॉल संघ राज्यस्तरावर प्रथम!

अकोले प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा स्व.मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल,नाशिक येथे दि.12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान संपन्न झाल्या.
एकलव्य रेसिडेन्सीयल स्कूल राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते संपन्न झाले तर बक्षीस वितरण समारंभ श्री तुषार माळी अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक, अविनाश चव्हाण उपायुक्त व इतर अधिकारी या मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.
या स्पर्धेमध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल ,मवेशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.देवीदास राजगिरे यांनी दिली.शाळेने विविध खेळात मिळवलेले यश पुढील प्रमाणे
हॅंडबॉल,आर्चरी,तायक्वांदो, बॉक्सिंग,जुडो, कुस्ती,योगा इ.खेळामध्ये 17 सुवर्ण,15 रौप्य व 12 कांस्यपदक अशी एकूण 44 पदके मिळविली असून हॅंडबॉल या सांघिक खेळामध्ये मध्ये विजेते पद पटकावले असुन सुवर्ण पदक विजेते खेळाडू तायक्वांदो-हर्षल देसाई,शीतल गावित,अजित पावरा,कु.कल्पना महाले,कु.मंगला पाडवी.,बॉक्सिंग-कु.समीक्षा भांगरे,कु.श्रावणी भांगरे,कु.अंकिता सुरकुले, कु.अंजली ठाकरे,कु.प्रियांका चौधरी ,महेंद्र जाधव,जुदो-कु.अंजना नाईक
आर्चरी-नितीन जुर्डे,योगा-कु.नेहा भांगरे,कु.छाया चौधरी,कु.वर्षा पाडवी. यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक लक्ष्मण उदमले यांचे मार्गदर्शन लाभले होते.
यशस्वी खेळाडुंचें राजुर प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. राजेन्द्र भवारी,मवेशीचे सरपंच यमाजी भांगरे ,भाऊसाहेब खरसे ,शिवराज कदम, आदिनाथ सुतार या मुख्याध्यापकांसह, शाळा समितीच्या अध्यक्षा ताराबाई भांगरे, सदस्य, सोनू भांगरे, राजाराम भांगरे, श्री बांबळे शिक्षक सर्व श्री.नवनाथ इंगळे,विनोद जाधव,महेश सहाणे,योगेश लहामटे,सौ.कल्पना बगाड तसेच मवेशी संकुलातील अधिक्षिका व शिक्षक वृंद यांंनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असुन सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची गुंटूर,आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या एकलव्य राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांंचे यशस्वी आयोजन केलेबद्दल डॉ. देविदास राजगिरे यांचा एकलव्य संयोजन समितीव्दारा सत्कार करण्यात आला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.