इतर
नेप्तीच्या यमुनाबाई पुंड यांचे निधन

अहमदनगर /प्रतिनिधी-
नेप्ती (ता. नगर) येथील सौ. यमुनाबाई बबन पुंड यांचे वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी हलाकिच्या परिस्थितीत मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. नातेवाईकांमध्ये त्या सर्वांच्या आस्थास्थान होत्या. त्यांच्या पश्चात पती बबन पुंड, मुले सुरेश पुंड, हरिभाऊ पुंड ,संतोष पुंड ही तीन मुले सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचा अंत्यविधीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.