अहमदनगर

पत्रकार भवन उभारून डी. के. वैद्य यांच्या स्मृती जपूया – उत्तम कांबळे

डी के वैद्य समाजाचे प्रश्न मांडणारे उत्तम पत्रकार होते- डॉ सुधीर तांबे

अकोले/ प्रतिनिधी —

प्रा डी.के वैद्य यांच्या स्मरणार्थ सर्व सुविधायुक्त पत्रकार भवन उभारावे ज्यात सुंदर वाचनालय असावे डी.के. वैद्यांचे आत्मचरीत्र येणाऱ्या पिढीला वाचनास उपलब्ध असावे अशी अपेक्षा दैनिक सकाळचे माजी संपादक व ज्येष्ठ विचारवंत  उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली.
अकोले तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त व सेवानिवृत्त प्रा  कै. डि.के वैद्य यांच्या अभिवादन सभेत उत्तम कांबळे बोलत होते.

अध्यक्षस्थानी शेतकरी नेते झुंबरराव आरोटे होते तर नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॅा.सुधीर तांबे प्रा.अनिल सह्सत्रबुद्धे प्रमुख उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक लेखक हेरंभ कुलकर्णी, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयराव पोखरकर, भाऊसाहेब मंडलिक, अलताफ शेख,ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, बी.जे.देशमुख, नगराध्यक्षा साै सोनालीताई नाईकवाडी,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर, शांताराम गजे,श्रीनिवास येलमामे उपस्थित होते. 

   यावेळी उत्तम कांबळे म्हणाले कि बातमी लिहितो तो खरा बातमीदार होऊ शकत नाही ..बातमी तर कोणीही लिहितो .जो बातमीत जगण्याचा प्रयत्न करतो ज्याचे आयुष्याचे नाव बातमी होते.जिथे घटना संपते तिथून जो विचार करण्यास सुरुवात करतो तो खरा बातमीदार अशा बातमीदाराची बातमी संपत नाही ती मालिका तयार होते .एखाद्या अपघात झाला त्यात काही मयत झाले त्याचेवर अंत्यसंस्कार झाले कि घटना संपते मात्र त्यानंतर वैद्य याची बातमी सुरु होत असे अपघात कशाने झाला?  का झाला?  कुणाच्या चुकीने झाला अशी अनेक प्रश्नाची उकल करत बातमी डि.के वैद्य करत अर्थात इतर बातमीदाराची बातमी संपते तेथून डि.के.वैद्य ची बातमी सुरु होत असे.पूर्वी पत्रकार कधी पैसे कमावण्यासाठी कोणी होत नव्हते .आता वर्तमान पत्रातही स्पर्धा सुरु आहे प्रत्येकाला वाटते मी कसा पुढे जाईल वर्तमान पत्र व्यावसाय झाला . वैद्य यांनी कधीही बातमीस नाही शब्द काढला नाही कारण जो माणूस बातमीत जगत असतो त्याला बातम्याचा दुष्काळ कधीच नसतो.देशात अहमदनगर जिल्ह्याची पत्रकारिता आणि  जिल्ह्यात अकोलेची पत्रकारिता अव्वल स्थानावर आहे. प्रा. डी.के. वैद्य हे  बातमीदारासोबतच समाजसेवक होते, त्यामुळेच ते लोकप्रिय होते,माझा सकाळ मध्ये ४ हजार वार्ताहरांशी संपर्क होता, त्यात वैद्य सरांची ओळख काहीशी वेगळी आहेअध्यापनाच्या कार्यासह त्यांनी निष्कलंक पत्रकारिता केली, ही त्यांची खासियत होती. ज्यांच्या बातम्या वेगळ्या असल्याने त्या सकाळच्या विविध आवृत्तीमध्ये प्रसिद्ध होत असे. 

  यावेळी आमदार डॅा.तांबे म्हणाले कि वैद्य सर हे जितके चांगले शिक्षक होते तितकेच समाजाचे प्रश्न मांडणारे उत्तम पत्रकारही होते.सरानी शाळेतील शिक्षकासोबत सामाजिक शिक्षक म्हणूनही काम केले  डॉ. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले प्रा. वैद्य सर यानी समीक्षक म्हणून  योग्य काम केले, त्यामुळे त्यांच्या बातम्यांवर कोणीही रागावत नसे. ते शिक्षक म्हणून कार्यरत होते,

   यावेळी हेरंब कुलकर्णी, विनय सावंत, प्रकाश टाकळकर, शांताराम गजे, ॲड. बी. जी. वैद्य, देविदास भालेराव, बी. जे. देशमुख, एस.  टी. येलमामे यांनी वैद्य सरांच्या पत्रकारितेतील कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविकात अध्यक्ष विजय पोखरकर यांनी तालुका पत्रकार संघाचा लेखाजोखा मांडून वैद्य सरांच्या कार्याची माहिती दिली.   

जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक यांच्या पत्नी कै. सौ. रत्नप्रभा मंडलिक यांचे निधन झाले , त्यांच्याही स्मृती जागवून त्यांनाही यावेळी अभिवादन करण्यात आले.
उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, प्रा. तुळशीराम जाधव,ॲड.अनिल आरोटे, ऍड के.बी.हांडे, बाळासाहेब घोडके, नंदकुमार मंडलिक,सुनील गिते, संगमनेर पत्रकार मंचचे श्याम तिवारी,नितिन ओझा,शेखर पानसरे  अरुण कान्होरे, शांताराम कोकणे तात्या, एम.के. धुमाळ, राजेंद्र उकिरडे ,संतोष साबळे, सागर शिंदे,संजय उकिरडे ,बबनराव तिकडे, अयाज शेख , प्रा. डॉ.चंद्रकांत मंडलिक,अगस्ती चे संचालक अशोकराव आरोटे, रिपाईचे राजेंद्र गवांदे, चंद्रकांत सरोदे, शांताराम संगारे,शरद रत्नपारखी, अरुण रुपवते,स्टेट बँकेचे माजी अधिकारी श्री आरोटे साहेब,मधुकर बिबवे,नगरसेविका शीतल वैद्य,श्री.मालुंजकर मामा,आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश आरोटे यांनी केले तर आभार हेमंत आवारी यांनी मानले.———

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button