इतर

स्थानिक शिवभक्तांच्या साहाय्याने गड किल्ल्यावर शास्रोक्त विकास कामे – युवराज संभाजी राजे छत्रपती

पेमगिरी येथिल राष्ट्रीय छावा संघटनेच्या मेळाव्याला संभाजीराजे छत्रपती उपस्थित

संगमनेर | प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० किल्ल्यापैकी कोणत्याही किल्ल्याचे जतन व संवर्धन झाले नाही. स्वातंत्र्यानतंर रायगड किल्ल्याच्या संवर्धनावर आतापर्यत केवळ १ कोटी २० रुपये खर्च झाले, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यामुळे २००६ पासून आम्ही सरकारकडे ३० किल्ले जतन व संवर्धनासाठी मागत आहोत, त्या किल्ल्यामध्ये शहाजी महाराजाच्या पराक्रमासाठी ओळखल्या जाणाऱ्या पेमगिरीच्या शहागडाचा समावेश असून फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून व स्थानिक शिवभक्तांच्या साहाय्याने या किल्ल्यावर शास्रोक्त विकास कामे करण्यात येणार असल्याची ग्वाही युवराज संभाजी राजे छत्रपती यानी दिली.

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे राष्ट्रीय छावा संघटनेने आयोजित केलेल्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना युवराज संभाजी राजे छत्रपती बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख होते. स्वराज्यचे प्रवक्ते करण गायकर, छावाचे राष्ट्रीयअध्यक्ष गंगाधर काळकुटे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निखिल गोळे, गुजरातचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण कानवडे, सरपंच द्वारकाताई डुबे, सोमनाथ गोडसे, इतिहास अभ्यासक दिपक कर्पे, रोहित डुबे, संदीप निर्मळ, रावसाहेब डुबे, डॉ. मानिकराव शेवाळे, सोमनाथ नवले, शांताराम डुबे, नाशिक जिल्हाध्यक्ष कृष्णा घाटोळ, जळगाव जिल्हाध्यक्ष सचिन मालवणकर, संभाजीराजे हासे, अशोक राव, छावाचे जिल्हा सरचिटणीस संजय गायकवाड, संजय शिरतार, जालिंदर राऊत, जगन गंवादे, दिपक चोरमुले, विलास रसाळ, जितेंद्र मोकळ, देविदास पवार, दिनकर घुले, बाळासाहेब कानवडे आदिसह जिल्हा व तालुक्यातून आलेले छावाचे पदाधिकारी तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

संभाजी राजे पुढे म्हणाले की, शहागडाच्या पायथ्याशी असलेल्या पेमगिरी सह पंचक्रोशीतील नागरीक हे भाग्यवान आहेत. कारण स्वराज्य संकल्पक शहाजी राजे, मॉसाहेब जिजाऊ, थोरले संभाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज यानी महत्वाचा काळ या किल्ल्यावर व्यतीत केला आहे. त्यामुळे त्याचे या गडावर प्रेरणादायी स्मारक निर्माण करुन आपला हतिहास जीवंत ठेवावा लागेल. त्यासाठी शहागडाचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. तरचं जगभरातून पर्यटक याठिकाणी येण्यास सुरुवात होईल. त्यासाठी स्थानिकानी शहागडाच्या विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जगातील कोणत्याही देशात समुद्रात किल्ले नाहीत, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाचे १३ ते १४ किल्ले समुद्रात आहेत. त्यामुळे या किल्ल्यासह स्वराज्यातील ३० किल्ले आम्ही जतन व संवर्धनासाठी सरकारकडे मागत आहोत. त्यामध्ये ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पेमगिरी येथिल शहागडाचा देखिल समावेश असल्याचे सांगून संभाजी राजे म्हणाले की, राजधानी रायगड ते राजधानी मुबंई थेट आपल्याला जोडावी लागेल.

महाराष्ट्राचा विकास, स्वराज्यातील गडकोट, किल्ल्याचे जतन व संवर्धन यासाठी बुधवारी रात्री १२.३० वा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. स्वराज्यातील ३० किल्ले दत्तक देण्याची मागणी करुन फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून जतन व संवर्धनासाठी पैसे उभे करण्याची जबाबदारी आम्ही घेतली असल्याचे संभाजी राजे यानी सांगितले.

हर हर महादेव ’ व ‘ वेडात मराठा वीर दौडले सात ’ या चित्रपटातील विकृत मांडणीवर संभाजी राजे यानी कठोर शब्दात ताशेरे ओढत व्यक्तीरेखाच्या पेहरावर आक्षेप नोदंवून इतिहासाची चुकीची मांडणी भावी पिढीवर बिबवण्याचा प्रकार सुरु असल्याबदल नाराजी व्यक्तं केली. तर महिला सबलिकरन आता सरकारने सुरु केले असले तरी, महारानी ताराराणी यानी त्याकाळातचं याचां वस्तूपाठ घालुन दिल्याचे सांगितले.

पेमगिरी सह पंचक्रोशीतील नागरीकानी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवंत स्मारक असलेल्या शहागडाच्या विकासासाठी शरीरात उर्जा निर्माण करण्याचे आवाहन संभाजीराजे यानी करुन गडकोट जतन व संवर्धनासाठी राष्ट्रीय छावा संघटनकडून न मागता १ लाख २१ हजाराची देणगी तसेच भविष्यात २१ लाख रुपये देणार असल्याचे सांगितल्यामुळे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर काळकुटे यांचे आभार मानले. पेमगिरी येथे सुदंर मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल संयोजक प्रवीण कानवडे व त्याच्या सहकार्याचे कौतुक करत १६ सप्टेंबरला शहागडावर येणार असल्याचा शब्द उपस्थित विद्यार्थ्याना संभाजी राजे यानी यावेळी दिला आहे.

दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक व छावाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कानवडे यानी केले असून रणजितसिंह देशमुख, गंगाधर काळकुटे, दिपक कर्पे, रोहित डुबे व जितेंद्र पाटील यानी मनोगत व्यक्त केले आहे.

***

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button