राज्य व देशाच्या हितासाठी पवार कुटुंबिय राजकारणात पाहिजे

पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बुथ आढावा बेठक संपन्न !
दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी
राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही घडामोडी पाहता आपण राजकारण सोडून द्यावे की काय अशी अवस्था आज झाली आहे त्यामुळे सध्याचे राजकारण अभिमन्यूसारखे झाले असून हा परिवार एक राहिला पाहिजे हा परिवार महाराष्ट्राचे हित जपणारा व विकासाला दिशा देणारे आहे.त्यामुळे मला काही मिळाले नाही तरी चालेल परंतु महाराष्ट्र व देशाच्या हितासाठी पवार कुटुंबिय राजकारणात राहिले पाहिजे असे आमदार निलेश लंके म्हणाले.
दोन ते दिवसांपूर्वी महाराष्ट्र राजकीय घडामोडी ज्या घडल्या आहेत त्या दुर्भाग्य आहे त्या घटना धक्का देणा-या आहेत. राजकारणात विचार करण्याच्या पुढे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहे राष्ट्रवादी हा परिवार आहे त्यामुळे या परिवार सक्षम असुन खासदार शरद पवार खासदार सुप्रिया ताई सुळे अजित दादा पवार यांच्या बरोबर असुंन राजकारणात कुठलाही निर्णय घेतला तरी मान्य होतो की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.सोशलमिडियावर अनेक मतांतर येत आहेत. आपण पवार कुटुंबियाबरोबर आहे त्यामुळे कुटुंबात काही निर्णय घेता येत नाही त्यामुळे हा परिवार आहे मतदार संघाचा फायदा बरोबर पायाजवळ न पाहता पुढील १० वर्षे त्याचा फायदा झाला पाहिजे अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राजभवनात शपथविधीसाठी गेलो असता जे काही चाललं आहे ते धक्कादायक आहे.नेता कुठलाही निर्णय घेत असताना काही उद्देश व संदर्भ असतो.त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांत घट्ट नातं या कुटुंबियांशी झाले आहे.त्यामुळे या तिघांचे प्रेम व नाते माझ्या बरोबर आहे.

यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की
काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लागु शकतात त्यामुळे रात्रीतून काही होवु शकते हे राजकीय घडामोडीतुन दिसून येत आहे बुथ कमिटी ही सर्वच निवडणुकीसाठी हे महत्त्वाचे आहे.
आपल्या तालुक्याचा व मतदार संघाचा पाया भक्कम केला पाहिजे याचा फायदा प्रत्येक निवडणुकीत होईल.मतदार संघात ३६५ बुथ असून प्रत्येकाचा अभ्यास केला आहे.त्यामुळे कुठल्याही क्षणी कोणत्याही प्रकारची निवडणुका लागली तर सामोरे जाता आले पाहिजे.५० टक्के महिलांना आरक्षण असुन काम पण सक्षम केले पाहिजे.बुथकमिटी हा स्थानिक पातळीवरला विषय असुंन गावनिहाय गणनिहाय व गटनिहाय काम केले पाहिजे.सर्व समाजातील व घटकांतील प्रतिनिधीवर जबाबदारी सोपविण्यात येवून मायक्रो नियोजन केले तर त्याचा फायदा सर्वच निवडणुकांत ह़ोवु शकतो.आपल्या तालुक्यातील जे मतदार बाहेर आहेत त्यांची माहिती आवश्यक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर येथील आनंद लाॅन येथे राजकीय घडामोडीवर चर्चा करण्यासाठी व आगामी निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी बुथकमिटी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सभापती तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे,नगराध्यक्ष नितीन अडसुळ,जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर,अशोक सावंत, प्रशांत गायकवाड, उपसभापती बापूसाहेब शिर्के, सुदाम पवार,बाळासाहेब खिलारी,गंगाराम बेलकर,डॉ. खोडदे,संदीप सालके,विजय पवार,श्रीरंग रोकडे,राहुल झावरे,दादा शिंदे,कारभारी पोटघन मेजर,वसंत कवाद, ठकाराम लंके,दिपक पवार, सचिन पठारे,शेळके सर, पारनेर नगरपंचायतचे सर्व आजी माजी सभापती व नगरसेवक,खंडू भुकन शिवाजी आप्पा मोरे, भाऊसाहेब भोगाडे सर, सोमनाथ आहेर,रा.या.औटी, बाळासाहेब खिलारी,संजय लाकुडझोडे,खंडू भुकन, सुवर्णा धाडगे,वंदना गंधाक्ते, पुनम मुंगसे,दिपाली औटी, वैजयंता मते,मनिषा जाधव, संगीता दरेकर,पाकीजा शेख, कल्पना थोरात,विजय डोळ, नंदु देशमुख,बंडू गायकवाड, बबलुशेठ रोहकले,सुनिल करंजुले,शिवा शिंदे,राजू शिंदे, चंद्रभान ठुबे,रविंद्र राजदेव, पोपट गुंड,राजू चेडे,आप्पा शिंदे,बाजीराव दुधाडे,राजू चेडे,सतिष भालेकर,दौलत गांगड,रविंद्र गायके,किसन गंधाडे,बाळासाहेब पुंड, अनिल गंधाक्ते,
ज्ञानदेव लंके गुरुजी, जितेश सरडे,पाणी पुरवठा सभापती योगेश मते, मा.सरपंच बाळासाहेब नगरे,बांधकाम सभापती भुषण शेलार, श्रीकांत चौरे,संदीप चौधरी, महेंद्र शिंदे,शशि आंधळे,गुंडा भोसले,संदीप ठाणगे,किरण ठुबे,आनंदा औटी,कांतीलाल भोसले,प्रविण थोरात, बी.ए .भगत,महेंद्र गायकवाड, बाळासाहेब दिघे,सुभाष गाजरे,किरण पानमंद,प्रकाश गाजरे,संग्राम ईकडे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– लालदिवा मिळाला तर सरकारमध्ये विचार करावा.. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना
राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर येथील आनंद लाॅन येथे राजकीय घडामोडीवर चर्चा करण्यासाठी व आगामी निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी बुथ कमिटी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिका-यांनी या राजकीय सत्तांतर व घडामोडीत मंत्री पदाची संधी मिळाली तर विचार करावा अशी मागणी आपल्या भाषणात केली.त्यामुळे आमदार निलेश लंके जे भुमिका घेतील त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.