नृत्यांजली नृत्य संस्थेचे १८ वे वार्षिक संमेलन सम्पन्न ..

पुणे दि18
महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या रमा पुरुषोत्तम संकुल च्या अॅम्पीथिएटर मध्ये नृत्यांजली नृत्य संस्थेचे १८ वे वार्षिक संमेलन पार पडले..
यामध्ये गणपती, शंकर, कृष्ण ,देवी , आणि श्रीरामा वर आधारित विविध भरतनाट्यम नृत्यशैलीतून मुलींनी रचना सादर केल्या.
नृत्यांजली नृत्य संस्थेच्या – वारजे , महर्षी कर्वे शिक्षण संस्था , कोंढवा (NIBM ) आणि धायरी शाखेच्या विद्यार्थ्यांनीच यामध्ये सहभाग होता.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अंतर्गत वेणूबाई बालगृह हा विभाग चालविला जातो. बालगृहात येणाऱ्या विद्यार्थिनी या अनाथ, एकपालक व द्विपालक अशा असतात.

नृत्यांजली नृत्य संस्था गेली तीन वर्षे बालगृहातील मुलींना भरतनाट्यमचे प्रशिक्षण देत आहेत. या कार्यक्रमात
नृत्याजली नृत्य संस्थेतर्फे बालगृहातील विद्यार्थिनींना पहिल्यांदाच आपली कला सादर करायची संधी मिळाली .नृत्यांजली नृत्य संस्थेच्या संचालिका गुरू वैशाली पारसनीस यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक आणि पारितोषिक देण्यात आली.

या कार्यक्रमाचे नृत्यांजली नृत्य संस्थेच्या ज्येष्ठ शिष्या अमृता जमदग्नी आणि विभावरी गोडबोले यांनी सूत्र संचालन केले.