इतर

नगर च्या झेडपीत भ्रष्टाचार बोकाळला ! अनेक जण अँटिकरप्शनच्या रडारवर ?

अहमदनगर दि १९ अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये अनेक विभागांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे गैरमार्गाने जनतेची ठेकेदारांची अडवणूक करून कर्मचारी व अधिकारी पैशांची भरमसाठ वसुली करत असल्याचे समोर येत आहे यामुळे अहमदनगर जिल्हा परिषदेतील शिक्षण आरोग्य बांधकाम समाज कल्याण अशा ग्रामपंचायत अशा वेगवेगळ्या विभागात भ्रष्टाचार व कळला आहे अधिकारी व कर्मचारी सभ्यतेचा आवाहनच अनेक काही प्रकार करून आपले उखळ पांढरे करत असल्याचे समोर आले आहे शिक्षण विभागातील एका महिला कर्मचाऱ्याला पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच पकडले आहेत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला ही बाब काही नवीन नाही यापूर्वी देखील अँटी करप्शन चे अनेक साबळे जिल्हा परिषदेमध्ये झाले आहेत तरी देखील जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचार कमी होताना दिसत नाही दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे येत आहे सध्या जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय कारभार सुरू आहे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने पदाधिकारी जिल्हा परिषदेकडे फिरकत नाही याचा गैरफायदा प्रशासकीय अधिकारी घेत आहेत अधिकारी कर्मचारी घेत आहेत बांधकाम विभागाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे शनिभागात शिक्षण विभागात नुकत्याच झालेल्या सापळ्याने आता जिल्हा परिषदेमधील गैरप्रकार पुन्हा समोर आला आहे याबरोबरच जिल्हा परिषदेच्या अनेक विभागात सुरू असलेला भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांवर लाच लुकपची नजर आहे या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक तक्रारी गेल्याने हे कर्मचारी अधिकारी अँटी करप्शन च्या रडारवर आहेत यातील आणखी काही कर्मचारी अँटी करप्शन च्या जाळ्यात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे



आरोपी लोकसेविका चंदा चंद्रकांत ढवळे, वय – ४५ वर्ष, वरिष्ठ सहाय्यक, वर्ग – ३,
प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांनी ५००० /- रुपये लाचेची
मागणी केल्याबाबत
‘,
प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की, तक्रारदार हे जिल्हा परिषद शिक्षण विभागात शिक्षक आहेत.
तक्रारदार यांची पत्नी मे व जुन २०२१ मध्ये कोरोना आजाराने आजारी असलेने त्यांना उपचारासाठी नगर मधील
खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. तक्रारदार यांनी पत्नीचे वैद्यकीय
उपचाराचे बील स्वतः भरले व त्यानंतर सदरचे बील जिल्हा परिषद मधुन मंजूर होऊन मिळणेकरीता सर्व आवश्यक
त्या कागदपत्रांसह पंचायत समिती श्रीरामपूर मार्फत जुलै २०२१ मध्ये दाखल केले. सदर बील मंजुर करणे करीता
यातील आरोपी लोकसेविका चंदा चंद्रकांत ढवळे, वय – ४५ वर्ष, वरिष्ठ सहाय्यक वर्ग-३, प्राथमिक शिक्षण
विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांनी तक्रारदार यांचेकडे रु.५०००/- लाचेची मागणी केले बाबतची तक्रार,
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. त्या तक्रारीचे अनुषंगाने दि. ०७/११/२०२२ रोजी जिल्हा
परिषद शिक्षण विभाग येथे पंच साक्षीदारा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेविका चंदा
चंद्रकांत ढवळे यांनी तक्रारदार यांचेकडे रु.५०००/- लाचेची मागणी करुन सदर रक्कम स्विकारण्याची तयारी
दर्शविली म्हणून आज दि.१७/११/२०२२ रोजी आरोपी लोकसेविका चंदा चंद्रकांत ढवळे यांचेविरुध्द कोतवाली
पोलीस स्टेशन, जि. अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लोकसेविका चंदा चंद्रकांत ढवळे
यांना ताब्यात घेतले आहे.
सदर सापळा कारवाई ही मा. सुनिल कडासने, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
परिक्षेत्र, नाशिक, मा. नारायण न्याहळदे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र,
नाशिक व मा. नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर कडील पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर,
पोलीस निरीक्षक गहिणीनाथ गमे, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोहेकॉ संतोष शिंदे, पोना विजय गंगुल, पोना. रमेश
चौधरी, पोकॉ. रविंद्र निमसे, पोकॉ वैभव पांढरे, पोकॉ बाबासाहेब कराड, मपोना. संध्या म्हस्के, मपोना राधा खेमनर व
चालक पोहेकॉ हारुण शेख यांचे पथकाने केली आहे.
कोणीही लोकसेवक सर्व सामान्य जनतेला त्यांचे काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर
त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, अहमदनगर येथे खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे
आवाहन पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर यांनी केले आहे.
कार्यालयाचा पत्ता
फोन नंबर
टोल फ्रि नंबर
पोलीस उप अधीक्षक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकिय इमारत,
टि.व्ही. सेंटरसमोर, सावेडी, अहमदनगर
०२४१-२४२३६७७
१०६४
Datang
(हरिष खेडकर)
पोलीस उप अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button