इतर

जवळेबाळेश्वर ,ब्राह्मणवाडा पाणी योजनेला पिंपळगाव खांड धरणातून पाणी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कळंब ,मन्याळे, ब्राह्मणवाडा व संगमनेर तालुक्यातील जवळेबाळेश्वर या ठिकाणीच्या पाणी योजनांसाठी मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरणातून पाणी नेण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे याबाबत लवकरच आंदोलन करण्याचा इशारा पिंपळगाव खांड धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे

पिंपळगाव खांड धरणातून जवळेबाळेश्वर आणि ब्राह्मणवाडा या ठिकाणच्या जलजीवन मिशन पाणी योजनांचे काम सुरू आहे या पाणी योजनां साठी पिंपळगाव खांड धरणातून थेट पाणी उचलण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे मात्र या धरणातून या पाणी योजनांना थेट पाणीपुरवठा झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांच्या पिण्याचा व शेतीचा पाणी प्रश्न बिकट होणार आहे यामुळे धरणग्रस्त शेतकरी उघड्यावर पडतील आणि बाहेरगावच्या शेतकऱ्यांना पाणी देऊन स्थानिक शेतकऱ्यांचे शेती आणि पिण्याचे पाणी हिसकावून नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप धरणग्रस्त यांनी केला आहे
या धरणातून पाणी नेण्यास आमचा तीव्र विरोध असून धरणाच्या खालील बाजूस स्वतंत्र उद्भव तयार करून त्या स्वतंत्र उद्भवातून पाणी नेण्यास आमची हरकत नाही मात्र धरणातील पाणी साठ्यातून थेट पाणी उचलणे आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे काल जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांची समन्वय बैठक पार पडली या बैठकीत शेतकऱ्यांनी या पाणी उचलण्याला तीव्र विरोध केला या बैठकीस संजय साबळे ,गौतम रोकडे, राहुल साबळे निलेश गंभीरे, अतुल चौधरी, गणेश चौधरी , श्रीधर साबळे भाऊसाहेब साबळे अशोक डेरे आदी सह कोतुळ ,पिंपळगाव खांड बोरी ,वाघापूर या परिसरातील शेतकरी उपस्थित होते
याबाबत लवकरच आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असे बोरी चे माजी सरपंच संजय साबळे यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button