आपली संस्कृती आणि परंपरा या सर्व गोष्टींचे भान ठेवून तरुणांनी खेळात पुढे जावे–आमदार डॉ किरण लहामटे

विलास तुपे
राजूर/ प्रतिनिधी
-आश्रमशाळा विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मार्गाने मोठे होऊन स्वत:चा विकास साधुन जीवनाला आकार द्यावा .आपली संस्कृती आपल्या परंपरा या सर्व गोष्टींचे भान ठेवून पुढे जावे. व्यसनापासून दूर राहून क्रीडा व्यक्तमत्व व आरोग्य संपन्न व्हावे.असे आवाहन आमदार डॉ किरण लहामटे यांनी केले
शैक्षणिक संकुल मवेशी (ता.अकोले) येथील शैक्षणिक संकुलात दिनांक 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान
मवेशी गावचे सरपंच श्री.यमाजी भांगरे व विविध मान्यवरांंच्या उपस्थित
आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी आ. डॉ. किरण लहामटे बोलत होते .

शैक्षणिक संकुल मवेशी ता.अकोले येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजुर यांच्यातर्फे नगर जिल्ह्यातील 36 शासकीय व अनुदानित आश्रम शाळेच्या मुलांच्या प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी डॉ. लहामटे आपल्या पुढे म्हणाले की, आदिवासी विद्यार्थी शरीराने काटक व कणखर क्रीडाक्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत. वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून क्रीडा कला व संगणक शिक्षक नसतानाही स्वतःचं नैपुण्या दाखवत आहेत. आश्रमशाळा विद्यार्थ्यांना चांगले विद्यार्थी घडावेत म्हणुन शिक्षण ,आरोग्य व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना शासनाने उपलब्ध करून द्याव्यात व आश्रम शाळेतील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार यासाठी कला, क्रीडा व संगणक शिक्षक आश्रमशाळेत भरण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा व मुलांचा सांस्कृतिक विकास साधावा असेही विचार डॉ. लहामटे यांनी आपल्या प्रमुख भाषणात व्यक्त केले.

दिनांक 16 नोव्हे.रोजी राजुर प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. राजेंद्र भवारी यांच्या हस्ते प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले तर दि. 18 नोव्हेंबर रोजी डॉ. किरण लहामटे व मवेशी गावचे सरपंच श्री. यमाजी भांगरे ,अनिल भांगरे,कुलदीप पाटील,सहा.प्रकल्प अधिकारी खेडकर, नानासाहेब झरेकर झणान ,सुरेश बोटे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तसेच राजुर प्रकल्पातील विविध शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धेचे समन्वयक म्हणून श्री कैलास नवले,कार्यक्रमाचे संयोजन शिवराज कदम,आदिनाथ सुतार, भाऊसाहेब खरसे व ड. देवीदास राजगिरी,लिना पटनाईक या मुख्याध्यापकांनी केले.
कार्यक्रमास राजुर प्रकल्पातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. नगर जिल्ह्यातील 36 आश्रम शाळेची 11 20 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाली होते.

सदर स्पर्धेत वेगवेगळ्या खेळ प्रकारात ज्या विद्यार्थ्यांनी नाविन्य संपादन केले ते विद्यार्थी पुढील प्रमाणे
.*हॉलीबॉल* 14 वर्ष वयोगट-विजेेता- आदर्श आश्रमशाळा भंडारदरा. 17 वर्षे वयोगट-विजेता- आदर्श आश्रमशाळा भंडारदरा. 19 वर्षे वयोगट-विजेता- शासकीय आश्रमशाळा केळी रूम्हणवाडी.
*हँडबॉल* 14 वर्ष वयोगट-विजेता- शासकीय आश्रमशाळा सावरचोळ 17 वर्षे वयोगट -विजेता-आदर्श आश्रमशाळा भंडारदरा 19 वर्षे वयोगट-विजेता- शासकीय आश्रम शाळा केळी रूमनवाडी
*खोखो* 14 वर्ष वयोगट-विजेता- अनु. आश्रम शाळा वळण. 17 वर्षे वयोगट-विजेता- शास. आश्रमशाळा केळी रूम्हणवाडी 19 वर्षे वयोगट-विजेता- अनु. आश्रम शाळा खडकी. *कबड्डी* 14 वर्षे वयोगट-विजेता- शास. इंग्रजी माध्य. राजुर कॅप मवेशी. 17 वर्षे वयोगट-विजेता- शास. आश्रम शाळा तिरडे. 19 वर्षे वयोगट-विजेता- शास. आश्रम शाळा केळी कोतुळ
*रिले* चार × 400 -14 वर्ष वयोगट- विजेता- शास. आश्रम शाळा केळी.रु.वाडी. *रिले* 4 × 100- 17 वर्ष वयोगट-विजेता-शास.आश्रम शाळा अकलापूर .*रिले* 4 × 100 19 वर्ष वयोगट-शास.आश्रम शाळा अकलापूर. *5 हजार मीटर चालणे 17 वर्षे वयोगट*- प्रथम- विनायक सखाराम भारमल. द्वितीय- दौलत बळीराम सोडणार घाटघर. *3000 मीटर चालणे 17 वर्षे वयोगट प्रथम- राहुल पिंटू पिंपळे पिंपळदरी, द्वितीय अंकुश शंकर पोकळे घाटघर,
दीड हजार मीटर चालणे- सुभाष सखाराम गिरे घाटघर ,द्वितीय सचिन अशोक मेंगाळ पिंपळदरी. *800 मीटर चालणे*प्रथम – अक्षय ढवळा आगविले पिंपळदरी,व्दितीय-दीपक राजाराम निसरड केळी रू.वाडी. *400 मीटर चालणे* प्रथम-राजू अंकुश रोंंगटे मुतखेल,व्दितीय-दयानंद राजेंद्र कांगुणे कोळेवाडी.*200 मीटर चालणे* -प्रथम -पवार किरण आनंदा अकलापुर, द्वितीय- कुलाळ रोहित सोमनाथ केळी रू.वाडी *100 मीटर चालणे*- प्रथम-रामनाथ राजपूत चांदेकसारे,व्दितीय-किरण बाजीराव गायकवाड आदर्श, *600मिटर -चालणे-14 वर्ष वयोगट* पोरे दत्ता संपत आदर्श ,द्वितीय- पथवे सचिन तुळशीराम केळी रू.वाडी *400 मीटर चालणे*- प्रथम-आघाने प्रविण चंद्रकांत पिंपळदरी,व्दितीय-भांगरे सचिन नामदेव एकदरे, *200 मीटर चालणे*-प्रथम-मधे अक्षय हनुमंता अकलापुर,व्दितीय-जाधव विशाल लक्ष्मण साकूर .*100 मीटर चालणे*- मधे अक्षय हनुमंत अकलापुर,व्दितीय-कोथे तुषार कुंडलिक देवठाण.*5000मिटर चालणे*- 19 वर्षे वयोगट- प्रथम -नाडेकर मच्छिंद्र रोहिदास खडकी, व्दितीय-गोडे प्रदीप सुरेश. केळी रू.वाडी

धावणे* 14,17,19 वर्षवयोगट- प्रथम, व्दितीय-पुढीलप्रमाणे-
*3000 मीटर- *- 19 -मधे सुनिल अनंता अकलापूर ,रोकडे विशााल नवनाथ अकलापुर. *1500 मीटर कोरडे रोहित दशरथ मान्हेरे, भांगरे ईश्वर पोपट पिंपरकणे.*800 मीटर धावणे*- धिंंदळे रवी ज्ञानदेव केळी कोतुळ , डगळे विकास रवींद्र केळी रू.वाडी *400 मीटर धावणे*- शेळके अक्षय रामनाथ खडकी, तळपाडे प्रवीण अनिल केळी रु.वाडी. *200 मीटर धावणे*- रोकडे विशाल नवनाथ अकलापुर, भांगरे प्रशांंत शंकर केळी रू.वाडी. *100 मीटर धावणे*- बर्डे राहुल दगडू अकलापुर, जाधव मयूर लक्ष्मण केळी रू.वाडी .*उंच उडी* *14 ,17,19 वर्ष वयोगट*-प्रथम,व्दितीय पुढिलप्रमाणे-*14 वर्ष* कार्तिक बाळासाहेब घोलवड राहुरी,कृष्णा सावळेराम माळी टाकळी. *17 वर्ष*- रोहित अशोक खडके घाटघर समीर गोरक्षनाथ पवार पिंपळदरी *19 वर्षे* करण लहानु माळी अकलापुर मयूर लक्ष्मण जाधव केळी रूमनवाडी *भालाफेक* 14 ,17,19 वर्ष वयोगट प्रथम, व्दितीय-पुुढिलप्रमाणे-विशाल निवृत्ती डगळे केळी रू.वाडी, माणिक कृष्णा सावळेराम टाकळी,17 वर्षे लोहकरे सचिन लक्ष्मण इंग्रजी माध्यम मवेशी, पिंपळे राहुल पिंटू पिंपळदरी. 19वर्ष-कुणाल सचिन साहेबराव केळी रू.वाडी, काळे सुनील कैलास सारोळे पठार.*गोळा फेक* 14,17,19 वर्ष वयोगट प्रथम, द्वितीय पुढिलप्रमाणे-14 वर्ष-कार्तिक बाळासाहेब गोलवाड राहुरी, तुषार कुंडलिक कोथे देवठाण 17 वर्षे अर्जुन सुनील कोंढार इंग्रजी माध्यम मवशी, शुभम मुरलीधर लांडगे पिंपरकणे . 19 वर्ष रोकडे विषाल नवनाथ अकलापुर दुधवडे विशाल पोपट अकलापुर. *थाळीफेक* 14,17,19 वर्ष वयोगट प्रथम, द्वितीय पुढिल प्रमाणे-14 तुषार कुंडलिक पथवे देवठाण ,दत्ता संपत पोरे आदर्श .17 सचिन लक्ष्मण लोहकरे मवेशी, शुभम भिमराव बुळे कोळेवाडी 19 विनायक सखाराम भारमल ,मवेशी, रवींद्र संजय गायकवाड अकलापुर .*लांब उडी* 14,17,19 वर्ष वयोगट प्रथम,व्दितीय पुढिलप्रमाणे-दत्ता संपत पोरी आदर्श विशाल लक्ष्मण जाधव साकुर 17 वर्ष पवार किरण आनंदा अकलापुर अनिल सुभाष गायकवाड वळण 19 वर्ष सुनील निवृत्ती अस्वले मवेशी मराठी, विशाल नवनाथ रोकडे अकलापुर

प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धासाठी शैक्षणिक संकुलातील जगन्नाथ जाधव,मारुती लहामटे,स्वप्नील सोनवणे, गणेश कोकाटे,मेघना खेडकर, राम काळुसे,भरत पाटील, अण्णासाहेब कानवडे,जमिला शेख, पल्लवी वाकचौरे,समाधान सुर्यवंशी,बुध्दभुषन भांबरे यांच्यासह सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.