अगस्ति तर्फे मंगळवारी ऊस पीक परिसंवादाचे आयोजन

अकोले प्रतिनिधी
– अगस्ति सहकारी साखर कारखाना लि, अकोले यांचे वतीने दर एकरी अधिकाधिक ऊस
उत्पादन वाढविणेच्या उद्देशाने मंगळवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ रोजी साई लॉन्स, इंदोरी फाटा येथे
सकाळी १०.०० वाजता शेतकरी मेळावा व ऊस पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले
असल्याची माहीती कार्यकारी संचालक अजित देशमुख यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे चे ऊस प्रजनन विभागाचे प्रमुख, डॉ. रमेश हापसे साहेब तसेच स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज् चे जनरल मॅनेजर योगेशजी म्हसे हे अधिकाधिक ऊस उत्पादन देणा-या प्रजाती त्यांची ओळख, वैशिष्ठ्ये याबद्दल मार्गदर्शन करणार असून खतांची संतुलित मात्रा, ऊस पीक पोषणामध्ये रासायनीक खतांचे महत्व या विषयावरील सखोल मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमाचे
उदघाटक म्हणून आमदार डॉ. किरणजी लहामटे उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान
कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर भूषविणार आहेत.
तरी जास्तीत जास्त ऊस उत्पादक सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकराव भांगरे यांनी केले आहे.
अधिकाधिक ऊस क्षेत्र लागवडी खाली आणणे, दर एकरी शंभर मे.टनापर्यंत उत्पादन मिळविणे तसेच
शाश्वत ऊस शेतीची संकल्पना शेतक-यांसमोर प्रभावीपणे मांडणे हा उद्देश या कार्यक्रमाचा असून
बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कीड, रोग यांना प्रतिकारक असणा-या, सर्वाधिक साखर उतारा व
ऊस उत्पादन देणा-या ऊसाच्या विविध जातींची ओळख, नवनवीन विकसीत वाणांची विस्तृत माहीती
यावेळी मिळणार असल्याने अकोले तालुक्यातील शेतकरी, ऊस उत्पादक सभासद यांनी या प्रसंगी
साई लॉन्स, इंदोरी फाटा येथे सकाळी १०.०० वा. उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा, मार्गदर्शनाचा लाभ
घ्यावा, असे आवाहन कारखान्याचे संचालक सर्वश्री कैलासराव वाकचौरे, मिनानाथ पांडे, परबतराव
नाईकवाडी, अशोकराव आरोटे, अशोकराव देशमुख, रामनाथ बापु वाकचौरे, यमाजी लहामटे गुरुजी,
मच्छिंद्रशेठ धुमाळ, कैलासराव शेळके, पाटीलबुवा सावंत, विकासराव शेटे, प्रदिप हासे, विक्रम नवले,
मनोज देशमुख, सुधीर शेळके, बादशहा बोंबले, सचिन दराडे, सौ. सुलोचना नवले, सौ. शांताबाई वाकचौरे, केन मॅनेजर सयाजीराव पोखरकर व शेतकी अधिकारी सतिष देशमुख यांनी केले आहे.
.