चंद्राची कोर…मामाची पोर….डीजे सॉंग रिलीज……

……गोकुळ राहाणे आणि मुंबई येथील अभिनेत्री ईश्वरी गायकवाड यांची प्रमुख भूमिका
संगमनेर – प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील कलाकार आणि दिग्दर्शक गोकुळ राहणे यांच्या चंद्राची कोर मामाची पोर या सिनेमॅटिक गाण्याचं लॉन्चिंग आज संगमनेर येथील एका हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात झालं.
पत्रकार मंडळी,जेष्ठ कलावंत, रंगकर्मी यांच्या हस्ते या गाण्याच्या पोस्टर अनावरण झाल्यावर सर्वांसमोर हे गाणं प्रसारित झालं आणि त्यानंतर youtube या सोशल माध्यमातून त्याचं रिलीज केलं गेलं. एक उमदा,हरहुन्नरी आत्मविश्वासू आणि ध्येयवेडा तरुण ठरवलं तर काहीही करू शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे गोकुळ राहाणे. लघुपट, वेब सिरीज, सिनेमॅटिक सॉंग्स, स्टोरीज या माध्यमातून गोकुळ राहणे हा आपलं कर्तृत्व सिद्ध करू पाहतोय, त्याचाच एक भाग म्हणजे आजचं चंद्राची कोर मामाची पोर हे गाणं आहे, या गाण्याचं संपूर्ण चित्रीकरण संगमनेर तालुक्यातील पेमगिरी परिसरामध्ये झालं असून नायकाच्या भूमिकेत स्वतः गोकुळ राहाणे आणि नायिकेच्या भूमिकेत मुंबई येथील अभिनेत्री ईश्वरी गायकवाड आहे.
या गाण्याचे लिखाण संगमनेर येथील कवी प्रोफेसर पुंजा भालेराव यांनी केले असून दर्जेदार चित्रीकरण आणि संगीत यामुळे हे गाणं येणाऱ्या काळामध्ये डीजेवर कब्जा करील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त करत गोकुळ राहणे यांच्या संपूर्ण कार्याला आणि टीमला शुभेच्छा दिल्या .
येणाऱ्या कालावधीमध्ये दिग्दर्शक गोकुळ राहाणे यांचं देवगड खंडोबावरील सिनेमॅटिक सॉंग आणि एक इतिहासावर आधारित प्रेरक संदेश देणारी शॉर्ट फिल्म रिलीज होणार आहे.
या लॉन्चिंग प्रसंगी जेष्ठ नाट्य कलावंत आणि लेखक, दिग्दर्शक डॉक्टर सोमनाथ मुटकुळे, नाट्यकलावंत श्रीकांत शिंदे, व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर, दीपक टाक, सूत्रसंचालक निलेश परबत, वकील मधुकर गुंजाळ, पत्रकार सोमनाथ काळे, संजय अहिरे, भारत रेघाटे, बाळासाहेब गडाख, सुखदेव गाडेकर, संजय साबळे, डॉक्टर अरविंद रसाळ, कवी प्राध्यापक पुंजा भालेराव, सुनील राहाणे गोकुळ राहाणे यांची पत्नी वंदना राहाणे आणि मित्र परिवार उपस्थितीत होते