इतर
रांजणगाव मशीद येथील शंकर गाढवे गुरुजी याचे निधन

पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील प्राथमिक शिक्षक श्री शंकर महादेव गाढवे याचे वयाच्या ७९ व्या वर्षी अल्पशः आजाराने दुखःद निधन झाले.
ते अतिशय शांत ,संयमी, आदर्श व्यक्तीमत्व होते.त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पारनेर तालुक्यातील बाबुर्डी,भोयरे गांगर्डा, हंगेवाडी, शिरापुर तसेच संगमनेर तालुक्यात पुर्णपणे खडतर प्रवासात आपल्या कार्य कुशलतेने शिस्त प्रिय पध्दतीने नोकरी पुर्ण केली.या सर्व परिसरात गाढवे गुरुजी आपल्या प्रेमळ स्वभावामुळे “अण्णा” नावाने परिचित होते.श्री गाढवे गुरुजी याचे ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.४५ ला अल्पशः आजाराने निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.