आजचे पंचांग व राशिभविष्य दि २३/११/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण ०२ शके १९४४
दिनांक :- २३/११/२०२२,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५०,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- कार्तिक
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति ०६:५४, अमावास्या २८:२७,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति २१:३७,
योग :- शोभन समाप्ति १५:३९,
करण :- चतुष्पाद समाप्ति १७:४४,
चंद्र राशि :- तुला,(१६:०४नं. वृश्चिक),
रविराशि – नक्षत्र :- वृश्चिक – अनुराधा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयदिन वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:१६ ते ०१:३९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:४१ ते ०८:०५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०८:०५ ते ०९:२८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५२ ते १२:१६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:२६ ते ०५:५० पर्यंत,
❀ दिन विशेष:-
दर्श अमावास्या, अन्वाधान, अमृत २१:३७ नं.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण ०२ शके १९४४
दिनांक = २३/११/२०२२
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
आज तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. मानसिक शांतीसाठी व्यायाम करा. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. प्रेमसंबंधात जवळीकता येईल
वृषभ
आज तुम्हाला काहीही बोलताना संयम बाळगावा लागेल. आर्थिक व्यवहारात अनावश्यक गुंतागुंत टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक कार्यात रस राहील. नोकरीत बदली होऊ शकते. धार्मिक प्रवास संभवतो. जोडीदार राग व्यक्त करू शकतो.
मिथुन
आज आर्थिक स्थिती मजबूत राहील. आत्मविश्वासात वाढ होईल. अधिकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला बढती मिळू शकते. कुटुंबात मंगल कार्यक्रमाचे नियोजन करता येईल. उधळपट्टी टाळा. लव्ह लाईफच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस शुभ आहे.
कर्क
अध्यात्मिक कार्यात मन व्यस्त राहील. वडिलांची साथ मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना चांगली बातमी मिळू शकते. प्रवासाची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल. जोडीदाराच्या भावना जपा.
सिंह
व्यर्थ धावपळ होईल. मित्राशी वाद संभवतो. ऑफिसमध्ये अतिरिक्त जबाबदारी मिळाल्याने तुम्ही नाराज होऊ शकता. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांसोबत पार्टीत सहभागी होऊ शकता.
कन्या
अभ्यासात रुची वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक आदरात वाढ होईल. आज तुम्ही कुटुंबासोबत खरेदीला जाऊ शकता. या राशीच्या अविवाहित लोकांसाठी वैवाहिक संबंध येऊ शकतात.
तूळ
आज सुरू केलेल्या कामात यश मिळेल. मन प्रसन्न राहील. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी आजचा दिवस शुभ आहे. भावा बहिणीचे सहकार्य मिळेल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.
वृश्चिक
दिवसाच्या सुरुवातीला समस्यांना सामोरे जावे लागेल. कार्यालयात टार्गेट पूर्ण न केल्याबद्दल तुम्हाला फटकारले जाऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. तरुणांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा.
धनु
दिवसाच्या सुरुवातीला चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. व्यवसायात मेहनतीनंतर फायदा होईल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. धार्मिक कार्याकडे कल राहील. प्रेम जीवनात मतभेद होऊ शकतात.
मकर
निरर्थक वादविवाद टाळा. व्यवसायाच्या विस्तारासाठी आजचा दिवस शुभ आहे. कार्यालयात अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. वडिलांच्या सहकार्याने आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. लव्हमेटकडून महागड्या भेटवस्तूंची मागणी होऊ शकते.
कुंभ
कौटुंबिक जीवन आनंदी राहील. पालकांचे सहकार्य मिळेल. या राशीच्या व्यापारी वर्गाला आज अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळेल. वाहन सुख संभवते. मित्रांच्या सहकार्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप भाग्यवान असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. राग टाळा. सतर्क राहा, भावनेच्या भरात घेतलेला निर्णय घातक ठरू शकतो.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर