इतर

नगर-दौंड महामार्गावर भीषण अपघात …

दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी…

अंकुश तुपे/श्रीगोंदा प्रतिनिधी –

नगर दौंड महामार्गावर विसापूर फाटा जवळ हॉटेल फौजीच्या समोर दौंडवरुन नगरला जाणाऱ्या इंडिका कारने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा नादात समोरून येणाऱ्या दुचाकींना जोरदार धडक दिली. त्यामध्ये दोन जण ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , सकाळी १०: ३५ मिनिटांनी नगरहून सौ कुलकर्णी सरिता व सचिन काळे हे मोटरसायकल क्रमांक एम एच १६ ए क्यू ८९८० वरून हॉस्पिटलच्या कामानिमित्ताने श्रीगोंदा कडे जात असताना दौंडच्या बाजूने विसापूर फाट्यानजीक हॉटेल फौजी समोर एक ट्रक चालला होता. त्यास इंडिका गाडी क्रमांक एम एच २० बी वाय ८९८० वेगाने ओव्हरटेक करीत असताना समोरून आलेल्या कुलकर्णी व काळे यांच्या दुचाकीस जोराने उजव्या बाजूने धडक दिली. त्यामध्ये दोघांचे पाय जागेवरच तुटले. त्यांच्या मागे कोरेगाव, ता. श्रीगोंदा येथील साबळे व कवडे हे दुचाकीवरून जात असताना इंडिका गाडी आपल्या अंगावर येत आहे हे पाहून त्यांनीही आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तरीही इंडिका गाडीने त्यांनाही जोरदार धडक दिली. त्यामध्ये त्यांचा जीव वाचला परंतु पोपट साबळे यांचा डावा पाय मोडला व कमरेमध्ये मोठ्या प्रमाणात सूज असल्याचे समजते. त्यांच्यासमवेत असणारे सुरेश कवडे यांच्याही पायाला प्लास्टर करण्यात आले आहे. हे दोघेही सध्या नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रस्त्यावर सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता.
जाणारे येणारे जखमींना मदत करण्यास थांबत नव्हते. त्याचवेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार हे तेथून जात असताना तेथे थांबले, त्यांनी कोळगाव चे सामाजिक कार्यकर्ते अमोल लगड व चिखलीचे केशव झेंडे ,तसेच इतर नागरिकांच्या मदतीने जखमींना बाजूला केले व पोलीस स्टेशन, ॲम्बुलन्स यांना तातडीने फोन केले. कोळगाव व बेलवंडी येथील ॲम्बुलन्स तेथे पोहोचताच त्यामध्ये जखमींना नागरिकांनी उचलून ठेवले. रुग्णवाहिका ने प्रथम नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना घेऊन गेले. परंतु तेथे डॉक्टरांनी कुलकर्णी सरिता व सचिन काळे यांना मृत घोषित केले. इतर जखमींवर नगर येथील खाजगी रुग्णालयात इलाज चालू आहे.

       
       
      

           

बेलवंडी पोलीस ठाण्यास माहिती मिळाल्यानंतर बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छीन्द्र खाडे,पीएसआय चाटे, पो. हे. कॉ. नंदू पठारे, पो. कॉ. भांडवलकर,पो. कॉ. हसन शेख यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास चालू आहे.


महामार्गावर दुभाजकाची गरज-
नगर -दौंड महामार्गावर बेलवंडी फाटा ते चिखली घाट दरम्यान आतापर्यंत 24 बळी गेले असून अजून किती बळी जाण्याची प्रशासन वाट बघणार आहे. कारण या रस्त्यावर दुभाजक नसल्याने बहुतेक अपघात हे ओव्हरटेक करताना होत आहेत. पांढरा पट्टयाचा वापर न करणे , वेगावर नियंत्रण नसणे, बेशिस्त पणे वाहन चालवणे, आता उसाचे ट्रॅक्टर पण चालू झालेत त्यामुळे या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. त्यासाठी हा रस्ता दुभाजक टाकून चौपदरी करण्याची मागणी प्रवासी व नागरिक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button