राजापूर महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

संगमनेर दि ९
प्रागतिक शिक्षण संस्थेचे, नूतन कला महाविद्यालय राजापूर येथे दिनांक 9 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महाविद्यालयामध्ये कला व सांस्कृतिक विभागाअंतर्गत वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी मुलींनी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ,मदर तेरेसा,महाराणी येसूबाई, बानू,म्हाळसा इ. महिलांची वेशभूषा करून सदर स्पर्धेमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थिनींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.साक्षी हासे, कु.अनुजा घोलप, कु.निकिता रहाणे या विद्यार्थिनींनी तसेच प्रा.अमोल खरात, प्रा.प्रतीक्षा खतोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महिला या अजूनही शोषित आहेत, गुलामगिरीचे आयुष्य जगत आहेत त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव व्हावी आणि त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी बंड करून उठावे असे मत प्रा.अमोल खरात यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.सुभाष कडलग सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. महिलांच्या सन्मानाचा कुठलाही एक दिवस नसून दररोजच महिलांना सन्मान मिळावा. एक महिला शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला सुशिक्षित बनवते. म्हणूनच महिलांना शिक्षणाचा राज्यघटनेने दिलेला जो अधिकार आहे त्याचा महिलांनी योग्य तो फायदा घेऊन सुशिक्षित व्हावे; जेणेकरून त्या संपूर्ण कुटुंबाला आणि परिणामी संपूर्ण देशाला सुशिक्षित बनवतील असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.मंगल हांडे यांनी भूषविले.
सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कडलग सर, उपप्राचार्य प्रा.सुभाष वर्पे सर तसेच प्रा.डॉक्टर मंगल हांडे, महाविद्यालयाच्या नॅक समन्वयक प्रा. संगीता जांगिड,सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शितल वाळुंज आणि प्रा.शितल देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रूपाली मुरादे यांनी केले.