नारायणगव्हान मध्ये आदिमा संस्थेची सहजयोगा सोबत महीला उद्योजकता कार्यशाळा संपन्न

दत्ता ठुबे
पारनेर :-नगर-पुणे महामार्गावरील मौजे नारायणगव्हाण येथे सहदायोग परिवाराच्या पावन प्रेरणेतून उभ्या झालेल्या आदिमा संस्थेने महीला दिनाच्या अनुषंगाने महीला सक्षमीकरण व सबलीकरणाचा उद्देश समोर ठेवून लोप पावत चाललेली कला प्रशिक्षण श्रीराम मंगल कार्यालय नारायणगव्हाण येथे राबवून महीलांना उत्तम प्रशिक्षण देण्यात आले व महिलांनीही उत्तम पद्धतीने विवीध वस्तू बनवल्या श्री निर्मलादेवींच स्वप्न खादीच्या वस्तू सर्वांनी वापराव्यात व महिलांना त्या वस्तू बनवण्याची कला प्राप्त व्हावी म्हणून आदिमा संस्थेने नारायणगव्हान मध्ये कार्यशाळा आयोजित करून महिलांना महिला दिनाच्या निमित्ताने महिला उद्योजकता हे राष्ट्र उभारणीचा प्रभावी माध्यम करण्याचा हेतू समोर ठेवून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार व कला प्राप्त व्हावी त्याचबरोबर महिला सबलीकरण सक्षमीकरण निर्माण करून महिलांना मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहजयोग ध्यान याद्वारे आनंदी जीवनाबरोबर अध्यात्माचे पूर्णत्व सहयोगातून सहज प्राप्त करून देण्यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन यशस्वी पद्धतीने राबविण्यात आले. यासाठी पुणे मुंबई येथून पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने हे आयोजन केले होते याबद्दल नारायणगव्हाण ग्रामस्थांनी आदिमा संस्थेचे आभार व्यक्त केले.
