पाथर्डी शहरातील अतिक्रमणच्या नावाने झालेली कारवाई अन्यायकारक

पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील छोट्या छोट्या व्यवसायिक आणि दुकानदारावर अतिक्रमणच्या नावाने झालेली कारवाई अन्यायकारक असून अगोदर त्यांचे पुनर्वसन करावे व मगच अतिक्रमण काढावे अशी मागणी पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली
पाथर्डी शहरांमधील प्रशासनाचे वतीने अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात आली हे अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवत असताना छोटे व्यवसायीक, छोटे दुकानदार, गरीब वर्ग यांच्यावर शासनाच्या वतीने वारंवार कारवाई करण्यात येते वास्तविक पाहता अगोदर त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या व्यवसायासंबंधी प्रशासनाचे वतीने योग्य ते नियोजन करावयास हवे तसे न करता दर सहा महिन्याला अतिक्रमण काढण्याच्या गोंडस नावाखाली गरीब आणि छोटे छोटे व्यावसायिक यांच्या हातावर पोट आहे अशा निष्पाप गरीब जनतेवर अन्याय करण्यात येतो याच्या विरोधामध्ये आज प्रांतसाहेब तथा उपविभागीय अधिकारी पाथर्डी उपविभाग यांच्याकडे मागणी करण्यात आली
अगोदर या व्यवसायिकांचे छोट्या दुकानदारांचे पुनर्वसन करण्याचा चांगला प्लॅन तयार करा त्याचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा जेणेकरून यांचे उपजीविकेचा प्रश्न हा कायमचा निकाली निघेल आणि मग तुम्ही अतिक्रमण खुशाल काढा ही मागणी पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष नासीर शहानवाज शेख यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तालुका काँग्रेसचे वतीने आणि सर्व अतिक्रमणधारकांच्या वतीने करण्यात आली तसेच प्रशासनाला विनंती करण्यात आली या मागणीचा तातडीने आणि अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करण्यात यावा व त्यासंबंधीचा एक चांगला प्रस्ताव तयार करावा अन्यथा या सर्व व्यावसायिकांना घेऊन छोट्या छोट्या दुकानदार व्यवसायिकांना घेऊन आम्ही रस्त्यावर त्यांच्या कुटुंबासहित व दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या भांडीकुंडी यांच्यासहित रस्त्यावर बेमुदत आंदोलन करू असा इशारा देण्यात आला

यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस जालिंदर काटे सर , माजी नगराध्यक्ष दिनकरराव पालवे,तालुका काँग्रेस उपाध्यक्ष रवी पालवे ,पाथर्डी तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष गणेश दिनकर, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अनिल जी साबळे , अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष जब्बार आतार, अशोक मस्के, रेखा आंधळे, गणेश अंतरकर, राजू गोला, भाऊ रावतळे, शाहरुख पिंजारी सोहेल शेख शौकत शेख लाला शेख, अल्ताफ शेख नॅशनल बाबा सह अनेक छोटे छोटे व्यावसायिक बांधव उपस्थित होते