खिरविरे येथील सर्वोदय विद्यालयात निरोप समारंभ!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील सर्वोदय विद्या मंदिर खिरविरे विद्यालयात इयत्ता दहावीचा सदिच्छा निरोप समारंभ विद्यालयात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनोहरराव देशमुख सीनियर कॉलेज राजुर येथील रोहित मुठे सर स
सागर वैद्य उपस्थित होते कार्यक्रमाची अध्यक्ष सूचना विद्यालयाचे शिक्षक श्री धुमाळ सर यांनी माडली अनुमोदन श्री कोते सर यांनी दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री परबत सर यांनी केले त्याचबरोबर उपस्थित प्रमुख पाहुणे रोहित मुठे सर व सागर वैद्य यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्यालयाचे माजी सचिव कै मोहन घिगे सर यांच्या स्मरणार्थ 2020/2021यावर्षी विद्यालयात प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1001, 701 व 501 रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं व गौरवचिन्ह देण्यात आले
याप्रसंगी विद्यालयातील इयत्ता दहावीच्या दहा विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यालयातील श्री पाचपुते सर श्रीमती वाळून मॅडम व श्री लहामगे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यानंतर अमेरिकेहून आलेले सागर वैद्य सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले रोहितमुठे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार श्री शिंदे यांचे सर यांनी मानले इयत्ता दहावीच्या वर्गाकडून विद्यालयास सहा खुर्च्या भेट म्हणून देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भदाणे सर यांनी केले