वाळवणे येथील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट नूतन विश्वस्त मंडळ जाहीर

दत्ता ठुबे/पारनेरप्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील महत्त्वपूर्ण देवस्थान श्री. क्षेत्र भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट नूतन विश्वस्त मंडळाची निवड आज सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रताप सातव यांनी जाहीर केली. ही नियुक्ती पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी असणार आहे. या देवस्थानवर भाजपच्या विखे पाटील गटाने एक हाती वर्चस्व मिळविले आहे. देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
सर्व विश्वस्त हे वाळवणे गावातीलच आहेत.
श्री. भैरवनाथ देवस्थान ट्रस्टवर निवड झालेले नवनिर्वाचित विश्वस्त पुढीलप्रमाणे..
सतीश पवार, सदाशिव पठारे, गोरखनाथ पठारे, शंकर थिटे, प्रतीक्षा थोरात, रवींद्र थोरात, दत्तात्रय थिटे, रमेश दरेकर, शहाजी दरेकर, राहुल दरेकर, चंद्रकांत पठारे, प्रशांत रोकडे, नितीन पठारे, राजेश पठारे, प्रमोद शिंदे
दरम्यान वाळवणे येथे श्री भैरवनाथ देवस्थान हे महत्त्वपूर्ण देवस्थान आहे. नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाचे नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील पारनेर तालुका भाजपचे नेते जि. प. सदस्य जलसंधारण समिती राहुल पाटील शिंदे, ज्येष्ठ नेते अहमदनगर जिल्हा मराठाचे विश्वस्त सिताराम खिलारी सर, जि. प. मा. उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, अहमदनगर भाजपा महिला अध्यक्षा अश्विनीताई थोरात, पारनेर तालुका भाजप तालुका अध्यक्ष वसंतराव चेडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ, सावली प्रतिष्ठानचे डॉ. भाऊसाहेब खिलारी, सरपंच मनोज मुंगसे, पारनेर भाजपा शहराध्यक्ष किरण कोकाटे, सरपंच पंकज कारखिले यांनी अभिनंदन केले आहे.