सुवर्णा भाऊसाहेब डेरे यांच्या दातृत्वातुन शालेय साहित्य वाटप.

. अकोले/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदगीरवाडी व इदेवाडी केंद्र खिरविरे येथे कु.सुवर्णा भाऊसाहेब डेरे आय.टी. इंजिनिअर,पुणे यांच्या उदार दातृत्वातुन रुपये 40,000/- चे विदयार्थांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यामध्ये वहया, पेन, पेन्सिल,नामांकित कंपनीचे दर्जेदार स्वेटर तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी मुख्याध्यापक रामदास आवारी(चंदगीरवाडी) , मुख्याध्यापक बाळासाहेब डेरे(इदेवाडी) व शरद तमनर,भाऊराव भांगरे सर्व शिक्षक आणि विदयार्थी उपस्थित होते.
कु.सुवर्णाताई भाऊसाहेब डेरे व भाऊसाहेबजी डेरे,शशिकला डेरे, विजयजी डेरे यांनी शाळेतील उपक्रम व अध्ययन पुरक उपक्रम याविषयी माहिती जाणुन घेतली. मुलांचा अभ्यास सामान्यज्ञान खेळ व राबविलेले उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले. व मुलांचे विशेष कौतुक केले.विशेष
स्वागत व प्रास्ताविक करतांना मुख्याध्यापक बाळासाहेब डेरे यांनी कु.सुवर्णाताई डेरे आय.टी.इंजिनिअर,पुणे यांचेकडे शाळेला मदत मिळावी म्हणून मिशन आपुलकी अंतर्गत पत्रव्यवहार केला होता. यासाठी कु.सुवर्णाताई डेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. केंद्र प्रमुख विजय भांगरे, विस्तार अधिकारी संभाजी झावरे , बायफचे विभागीय अधिकारी जितीनजी साठे व गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.केंद्रप्रमुख विजय भांगरे व गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी शिक्षकांच्या मिशन आपुलकी अंतर्गत शैक्षणिक कामकाजाबद्दल व दुर्गम भागात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेल्या निधीबद्दल शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कामकाजाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब डेरे यांनी केले.तर कार्यक्रमाचे नियोजन भाऊराव भांगरे यांनी केले.आभार प्रदर्शन शरद तमनर यांनी केले.
