पिंपरणे येथे चैतन्य गगनगिरी करंडक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न .

संगमनेर प्रतिनिधी
पिंपरणे, तालुका संगमनेर येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे संगमनेर साहित्य परिषद व विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धांना उस्फुर्त मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांचे हे 12 वे वर्ष असून उच्चांकी स्पर्धक प्रतिसादाने उल्लेखनीय झाले आहे. सुमारे 10तालुके,73 विद्यालये व 246 स्पर्धक या बाबी वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत.
स्पर्धांचे उद्घाटन विद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब देशमुख व संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष माननीय अरविंद गाडेकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने व परमपूज्य गगनगिरी महाराज आणि सरस्वतीदेवी यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाले. याप्रसंगी माजी प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे, डॉक्टर जी.पी.शेख,डॉ.मोटेगावकर,प्राध्यापक शशांक गंधे,नंदकुमार बेल्हेकर, प्रकल्प सचिव श्री कैलासशेठ काळे ,श्री सुरेश ठोंबरे माजी गटशिक्षणाधिकारी माननीय श्री.सुभाष पवार प्राचार्य मुकुंद डांगे सौ स्वाती देशमुख प्रकल्प प्रमुख बाळकृष्ण महाजन विभाग प्रमुख ललित शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर चार गटांमध्ये या स्पर्धा सुरू झाल्या. इयत्ता तिसरी चौथीच्या गटात 50 स्पर्धक विद्यार्थी होते. इयत्ता पाचवी ते सातवी या गटांमध्ये 90 विद्यार्थी ,इयत्ता आठवी ते दहावी या गटात 77 विद्यार्थी आणि इयत्ता अकरावी बारावी या गटात 29 विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते. विशेषतः
सर्वच स्पर्धक विद्यार्थी त्यांच्या विद्यालयांमधून निवडून पाठवलेले असल्यामुळे एकापेक्षा एक वरचढ अशी भाषणे विद्यार्थ्यांनी सादर केली. विद्यार्थ्यांना पारितोषिक प्राप्त घोषित करताना परीक्षकांची विशेष कसोटी लागली.अत्यंत अभ्यासपूर्ण विषय मांडणी, आत्मविश्वासपूर्ण ओघवते सादरीकरण भाषणांना होते. चार स्वतंत्र ठिकाणी चार गटांची भाषणे पूर्ण झाली. उत्तम नियोजनामुळे स्पर्धा यशस्वी झाल्या.

सहभागी सर्व स्पर्धक विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक परीक्षक या सर्वांसाठी भोजन व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली होती. परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व स्वयंसेवक विद्यार्थी या व्यवस्थेत स्वयंस्फूर्तीने सर्व स्पर्धक व परीक्षक शिक्षक यांची सुयोग्य व्यवस्था पहात होते.
12फिरते सांघिक करंडक, 12 वैयक्तिक कायमस्वरूपाचे स्मृतीचिन्ह व सुमारे साडेबारा हजार रुपयांची रोख पारितोषिके या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. सहभागी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा संदेश असणारे आकर्षक प्रमाणपत्र मिळणार आहे.
संगमनेर साहित्य परिषदेच्या सदस्यांनी आयोजनाबरोबरच परीक्षणाची महत्त्वाची भूमिका या स्पर्धांच्या वेळी पूर्ण केली आहे. प्राध्यापिका डॉक्टरअलका पेटकर, सौ.श्वेता सराफ,सौ पुष्पाताई नि-हाळी,

श्री दिलीप क्षीरसागर सर,श्री सुरेश म्हाळस सर, श्री.सौरभ म्हाळस श्री नंदकुमार बेल्हेकर, श्री निलेश परबत श्री. संतोष पवार, श्री बाबासाहेब मेमाणे ,अॕड. स्वप्नील कोल्हे, आदी मान्यवरांनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली. या स्पर्धांसाठी प्राध्यापक सुरेश परदेशी, मुक्त पत्रकार सौ स्मिता गुणे , सौ.सुलभा जोशी,श्री इद्रीसभाई शेख श्री गिरीश सोमानी , प्रकाश कोटकर, श्री मनोज साकी ,श्री.अनिल सोमणी, लक्ष्मण ढोले, श्रीमती मंगला पाराशर आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले व सहकार्य केले. ग्रामस्थ व पालक यांचाही उत्तम प्रतिसाद व सहभाग या स्पर्धांना लाभला .
